Mysterious Sanskrit text discovered in Germany: एका जर्मन व्यक्तीने अलीकडेच रेडीटवर देवनागरी लिपीतील मजकूर असलेल्या कागदांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे कागद त्याला हॅम्बर्गमधील एका फ्ली मार्केटमध्ये सापडले. या छायाचित्रांमध्ये हिंदी किंवा संस्कृत मजकूर असलेली दोन पिवळसर पाने दिसत आहेत. या वापरकर्त्याने मजकूराचा उगम आणि अर्थ समजून घेण्यासाठी Reddit समुदायाकडे मदतीची विनंती केली. त्यामुळे अनेक भारतीयांनी यावर प्रतिक्रिया देत, आश्चर्य व्यक्त केले आहे.

अधिक वाचा: Alexander the great’s purple tunic: ३००० वर्षे प्राचीन ‘अलेक्झांडर द ग्रेट’चा जांभळा अंगरखा अखेर सापडला; त्याचा भारताशी काय संबंध? 

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

या जर्मन व्यक्तीने फ्ली मार्केटमध्ये सापडलेल्या देवनागरी लिपीतील पिवळसर झालेल्या दोन पानांचे फोटो Reddit वर शेअर केलेल्यावर नेटकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांनी r/india सबरेडिटमध्ये ही पोस्ट शेअर करत भारतीय वापरकर्त्यांना या मजकूराची ओळख पटवण्यास मदत करण्याची विनंती केली. प्रथमदर्शनी त्यांनी हा मजकूर हिंदी किंवा संस्कृत असावा असे ओळखले होते.

Most users identified the text as belonging to a panchang printed in Varanasi. (Redddit/r/india)
पंचांग (Redddit/r/india)

भारतीय Reddit वापरकर्त्यांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हा मजकूर पंचांगातील असल्याचे ओळखले आहे (हिंदू कॅलेंडर आणि ज्योतिष पंचांग).जे धार्मिक कार्यक्रम आणि विधींच्या वेळा ठरवण्यासाठी वापरले जाते. वापरकर्त्यांनी नमूद केले की हे विशेष पंचांग वाराणसीमध्ये भास्कर प्रेसद्वारे छापले गेले असावे, ज्याचे मालक पंडित नवल किशोर भार्गव होते. नवल किशोर भार्गव हे त्या काळातील एक प्रसिद्ध प्रकाशक होते. एका वापरकर्त्याने आपल्या कुटुंबाची माहिती शेअर केली आणि सांगितले, “या प्रेसचे संचालन माझे पूर्वज पंडित नवल किशोर भार्गव यांनी केले होते. ज्यांचा प्रकाशन क्षेत्रात मोठा प्रभाव होता. त्यांचा उल्लेख मिर्झा गालिब चित्रपटातही आहे. त्यांनी हेही सांगितले की, असे मानले जाते की त्यांनी गालिबच्या लेखनाचे प्रकाशन नाकारले होते.

अधिक वाचा: Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?

या नव्या माहितीमुळे प्रभावित झालेल्या जर्मन व्यक्तीने सर्वांचे आभार मानले आणि विचारले की हा दस्तऐवज दुर्मिळ आहे का?.. काही लोकांनी उत्तर दिले की, याला आर्थिक दृष्टिकोनातून मोठे मूल्य नसले तरी त्याला सांस्कृतिक महत्त्व आहे, विशेषतः हा दस्तऐवज त्याच्या मूळ स्थानापासून इतक्या दूर कसा पोहोचला यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच जर्मन व्यक्तीने याया पंचांगाचे योग्यरित्या जतन करण्याचे ठरवले आहे. या दस्तऐवजाच्या घडलेल्या प्रवासाचा आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे तो हे करत आहे असेही त्याने म्हटले आहे.

Story img Loader