इंडोनेशियामधील बाली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बाली येथे फिरायला आलेल्या एका जर्मन पर्यटक महिलेने नग्न अवस्थेत येथील एका हिंदू मंदिरात प्रवेश केला. यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. या महिलेने मंदिरात जाण्यापूर्वी अंगावरचे सर्व कपडे उतरवले आणि मग ती आत गेली. या महिलेचं नाव दारजा तुशिंस्की असं असून तिचं वय २८ वर्ष इतकं आहे.

मिरर. सीओ. यूकेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, येथे आयोजित एका कार्यक्रमाचं तिकीट नाकारल्याने दारजा तुशिंस्की संतापली. या संतापातून तिने हे विचित्र पाऊल उचललं. तिने आधी तिथल्या सुरक्षारक्षकांशी धक्काबुक्की केली. त्यानंतर निषेध म्हणून तिने सर्व कपडे उतरवून मंदिरात प्रवेश केला. मंदिराचं दार उघडल्यावर तिला सुरुवातीला विरोध झाला. परंतु ती नग्नावस्थेत मंदिरात शिरली. तसेच तिथल्या नृत्यांगणांची नक्कल करू लागली.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ulhasnagar Bangladesh loksatta news
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
Kondhwa police station, women police beaten ,
कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Stones pelted at hawker removal teams vehicle in G ward of Dombivli
डोंबिवलीत ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या वाहनावर दगडफेक

त्यानंतर तिथल्या सुरक्षा रक्षकांनी दारजा हिला ताब्यात घेतलं आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस आल्यावर सुरक्षा रक्षकांनी या महिलेला पोलिसांच्या हवाली केलं. हे प्रकरण आता न्यायालयात असून ती दोषी आढळली तर तिला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.

हे ही वाचा >> “भाजपाच्या सर्वेनुसार शिंदे गटातला एकही खासदार…”, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा; म्हणाले, “गजानन कीर्तिकरांना समजलंय…”

या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या महिलेने उबुद येथील सरस्वती मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तसेच ती येथे आयोजित कार्यक्रमात नाचणाऱ्या नृत्यांगणांबरोबर नग्नावस्थेत नाचत होती. या २८ वर्षीय महिलेने मंदिराच्या गाभाऱ्यातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथल्या एका सुरक्षा रक्षकाने तिला तसं करण्यापासून रोखलं. इंडोनेशियन पोलिसांनी सांगितलं की, आम्ही चौकशी केल्यावर समजलं दारजा ज्या रिसॉर्टमध्ये राहात होती तिथेही ती सर्वत्र नग्नावस्थेत फिरायची.

Story img Loader