गुलाम अली हवालाने पैसा ट्रान्सफर करतात- पंकज उधास

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली हे भारतात कमावलेला पैसा हवालाने विदेशात पाठवतात

पंकज उधास
एका गुजराती दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीत गायक पंकज उधास यांची थेट गुलाम अलींनाच लक्ष्य केले.

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली हे भारतात कमावलेला पैसा हवालाने विदेशात पाठवतात असा गंभीर आरोप प्रसिद्ध गायक पंकज उधास यांनी केला आहे. गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रद्द करण्यात आला होता. गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध आणि दादरी प्रकरणावरून देशातील वातारवण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर एका गुजराती दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीत गायक पंकज उधास यांची थेट गुलाम अलींनाच लक्ष्य केले.

गुलाम अली गेल्या अनेक वर्षांपासून भारतात कार्यक्रम करत आहेत पण या काळात त्यांनी एक पैसाही कर म्हणून भरलेला नाही. त्यामुळे विदेशातील कलाकार हे भारताबद्दलच्या प्रेम आणि आदर म्हणून येथे येत नाहीत. तर, केवळ कमाई करण्यासाठी येतात हे स्पष्ट होते. मग अशा कलाकारांना ‘रेड कार्पेट’ का घालायचे?, असा खोचक सवाल उधास यांनी उपस्थित केला आहे.

भारतात पाकिस्तानी कलाकारांचा सन्मान होतो. ते मुक्तपणे वावरतात, बक्कळ पैसा कमावतात पण अशाप्रकारची वागणूक भारतीय कलाकारांना पाकिस्तानात मिळत नाही. व्हिसाची विनंती देखील मान्य केली जात नाही. मला स्वत:ला तीन वेळा पाकिस्तानचा व्हिसा नाकारण्यात आला, असेही उधास पुढे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ghulam ali sends money abroad through hawala pankaj udhas

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या