गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करत असून निष्पाप नागरिकांना मारले जात आहे. तसेच पूंछ जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून चकमक सुरू असून नऊ जवान शहीद झाले आहेत. काश्मीरमध्ये अशांतता असताना २४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. दहशतवादाच्या मुद्यावर भारताने पाकिस्तानशी आधीच संबंध तोडले आहेत. दोन्ही देश बऱ्याच काळापासून एकत्र कोणतीही मालिका खेळत नाहीत. पण विश्वचषक असताना भारताकडून नरमाईची भूमिका घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करत असून निष्पाप नागरिकांना मारले जात आहे. तसेच पूंछ जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून चकमक सुरू असून नऊ जवान शहीद झाले आहेत. काश्मीरमध्ये अशांतता असताना २४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. तसे, दहशतवादाच्या मुद्यावर भारताने पाकिस्तानशी आधीच संबंध तोडले आहेत. दोन्ही देश बऱ्याच काळापासून एकत्र कोणतीही मालिका खेळत नाहीत. पण विश्वचषक असताना भारताकडून नरमाईची भूमिका घेतली जात आहे.

परंतु काही काळापासून पाकिस्तान समर्थित दहशतवादी काश्मीर खोऱ्यात सातत्याने घटना घडवत आहेत. त्यामुळे पाकिस्तानसोबतच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. ‘बॅन पाक क्रिकेट’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.