scorecardresearch

शिक्षक पित्याचा मुलीवर बलात्कार; मुलीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केल्यानंतर आरोपीला अटक

मुलीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत न्यायाची मागणी केली आहे.

Crime News Rape Case
(प्रातिनिधिक फोटो)

पेशाने शिक्षक असलेल्या नराधम पित्याने स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात रोसेरा गावात ही धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रोसेरा गावातील ५० वर्षीय आरोपी हा पेशाने शिक्षक आहे. त्याच्या १८ वर्षांच्या मुलीने त्याच्यावर बलात्कार आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तिने तिच्या क्रूर कृत्य समोर आणण्यासाठी छुपा कॅमेरा वापरून या कृत्याला व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तिने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत न्यायाची मागणी केली आहे. तिने व्हिडीओ शेअर केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

रोसेरा उपविभागाचे डीएसपी सहियार अख्तर यांनी सांगितले की, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी मुलीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला आणि आरोपी वडिलांना अटक केली. “पोलिसांनी व्हायरल व्हिडीओमध्ये पीडितेसोबत दुष्कर्म करणाऱ्या वडिलांना अटक केली असून या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच पीडितेच्या जबाबावरून इतर आरोपींचा शोध सुरू आहे,” असे डीएसपी सहियार अख्तर यांनी सांगितले.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी वडिलांची चौकशी केली असून या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का याचा तपास सुरू केला आहे. तसेच पीडितेच्या आईने या कृत्याला विरोध केला नाही आणि तिचे मामा तिच्यावर या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी दबाव आणत होते, असा आरोप पीडितेने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl shoots video of father raping her shares on social media to seek justice accused arrested bihar hrc

ताज्या बातम्या