scorecardresearch

Premium

रमेश बिधुरी यांना योग्य शिक्षा द्या!; दानिश अली यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांच्या लोकसभेमधील वर्तनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे निषेध करावा आणि त्यांना योग्य शिक्षा होईल याची खबरदारी घ्यावी अशी मागणी बसप खासदार दानिश अली यांनी केली आहे.

Danish Ali Ramesh Bidhuri
दानिश अली, रमेश बिधुरी

पीटीआय, नवी दिल्ली : भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांच्या लोकसभेमधील वर्तनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे निषेध करावा आणि त्यांना योग्य शिक्षा होईल याची खबरदारी घ्यावी अशी मागणी बसप खासदार दानिश अली यांनी केली आहे. अली यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान २१ सप्टेंबरला रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांना उद्देशून असभ्य भाषा वापरल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी अद्याप त्याबद्दल काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. बिधुरी यांच्या भाषणानंतर आपल्याला वाढत्या प्रमाणात धमक्या मिळत असून आपल्या सुरक्षेमध्ये वाढ केली जावी, अशी मागणीही अली यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Devendra Fadnavis, Sanjay Raut, Sanjay Rauts statement, Devendra Fadnavis criticized Sanjay Raut
“संजय राऊत यांच्या पक्षात कोण मदारी आणि कोण बंदर, हे त्यांनाच ठाऊक” देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
godhan nyay yojana
गोधन न्याय योजना: छत्तीसगड सरकारनं ६५ हजार विक्रेत्यांकडून केली कोट्यवधींची शेणखरेदी, ५.१६ कोटी रूपये विक्रेत्यांच्या खात्यात!
Ajit Pawar on Amit Shah Mumbai Visit
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी गैरहजर का? अजित पवार स्पष्टच म्हणाले, “मी त्यांना…”
baban gholap
बबन घोलप यांचा उपनेतेपदाचा राजीनामा; ठाकरे गटाला धक्का, आज उद्धव ठाकरेंशी चर्चा

रमेश बिधुरी यांनी आपल्यावर चढवलेला शाब्दिक हल्ला हा केवळ वैयक्तिक नसून लोकशाहीवर केलेला हल्ला आहे असे अली यांनी या पत्रात नमूद केले आहे. सभागृहाचे नेते या नात्याने आपण या प्रसंगाची दखल घ्यावी, अशी विनंती अली यांनी पंतप्रधानांना केली आहे. बिधुरी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधानांचा संदर्भ देताना असभ्य भाषेचा वापर केला असा दावा अली यांनी केला आहे. त्याविरोधात मी भूमिका घेतली त्याला सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही सदस्याने विरोध केला नाही असे अली यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधानांच्या संदर्भात अवतरणात असली तरी अशा भाषेचा मी विरोध केला. त्यानंतर त्यांनाही आपली चूक कळली असावी आणि ते संतापले. त्यांनी सभागृहाचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी माझ्याविषयी अतिशय अपमानजनक शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली. -दानिश अली, खासदार, बसप

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Give proper punishment to ramesh bidhuri danish ali letter request to the prime minister ysh

First published on: 30-09-2023 at 00:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×