Air India Plane Crash Victims: ‘आम्हाला पूर्ण मृतदेह द्या, अवशेष नको’, असे आर्जव अहमदाबाद येथील विमान अपघातातील मृताच्या कुटुंबाने केले आहे. मृताच्या एका कुटुंबाला मृतदेहाची बॅग सोपविल्यानंतर त्यात दोन शिर आढळून आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यामुळे डीएनए चाचणीची प्रक्रिया पुन्हा करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत बातमी दिली आहे. आपल्या प्रियजनाचा मृतदेह मिळावा यासाठी अनेक कुटुंबे विनंती करत आहेत. मात्र स्फोटाची तीव्रता अधिक असल्यामुळे मृतदेहांची ओळख पटविण्यात मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

एकाच बॉडी बॅगमध्ये दोन शीर आढळल्यानंतर मृतदेह सोपविण्याच्या प्रक्रियेत अनपेक्षित गोंधळ निर्माण झाला. ज्यामुळे डीएनए चाचणीची प्रक्रिया पुन्हा करावी लागली. या चाचणीसाठी ७२ तास लागतात. शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, एका बॅगमध्ये दोन मृतदेहाचे अवशेष सापडल्यामुळे डीएनए चाचणीची प्रक्रिया पुन्हा करावी लागली. दोन मृतदेहाचे अवशेष एकाच बॅगेत नसायला हवेत.

१२०० खाटांच्या शासकीय रुग्णालयातील उत्तरीय तपासणीच्या खोलीबाहेर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डीएनए विश्लेषणासाठी मृतदेहाच्या पिशव्या एकत्र ठेवल्या आहेत. इथे जमलेले नातेवाईक आपल्या प्रियजनाचा पूर्ण मृतदेह मिळेल, यासाठी प्रार्थना करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आम्ही ठरलेल्या वैद्यकीय प्रक्रियेनुसार मृतदेहांचे अवशेष बॉडी बॅगमध्ये ठेवणे, ते कोल्ड स्टोरेजमध्ये हलवणे, त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी ओळख पडल्यानंतर अवशेष शवपेटीतून कुटुंबियांना देण्याचे काम करतो. मृतदेहाचे संपूर्ण अवशेष नातेवाईकांना देण्याची खात्री देण्यात आम्ही असमर्थ आहोत. स्फोटात जळाल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे.