Goa Assembly Election 2022: ‘हा’ असेल मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; ‘आप’ने केली उमेदवाराची घोषणा

१४ फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परिने शक्य ते सर्व प्रयत्न करत प्रचार आणि निवडणुकीची रणनीती आखत आहे. अशातच आता आम आदमी पक्षाने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. गोव्यातला हा लोकप्रिय चेहरा आता ‘आप’ला कितपत यश मिळवून देतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

पालेकर यांच्याबद्दल पणजीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “अमित पालेकर हे पेशाने वकील आहेत आणि ते भंडारी समाजातून आले असून ते गोव्यातील प्रत्येक समाजातील लोकांना मदत करत आहेत. करोना काळात गोव्यातील नागरिकांसाठी त्यांनी सर्वाधिक मदत केली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत गोव्यात ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाला असताना अमित पालेकर यांनीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती.

केजरीवाल पुढे म्हणाले, “गोव्यात भंडारी समाजाच्या लोकांना प्रगतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या समाजातील लोकांनी रक्त आणि घाम गाळून गोव्याच्या प्रगतीसाठी हातभार लावला आहे. गोव्यातील जनता विद्यमान पक्षांना कंटाळली आहे. गोव्यातील जनतेला आता परिवर्तन पाहिजे. त्यांच्याकडे आतापर्यंत पर्याय नव्हता, परंतु,आता आम आदमी पक्ष गोव्यात आला आहे. येथील जनता अमित पालेकर यांना साथ देईल आणि आम आदमी पक्षाला गोव्यातील लोकांची सेवा करण्याची संधी देईल.”

दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goa assembly election 2022 aam aadmi party arvind kejriwal amit palekar vsk

Next Story
बाटला हाऊसमध्ये दहशतवादी नव्हे, आमची मुले मारली गेली; काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या मौलाना तौकीर यांचे वादग्रस्त वक्तव्य
फोटो गॅलरी