येत्या एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गुरुवारी पणजीमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. कॅसिनो उद्योगाचे नियमन करण्यासाठी राज्याच्या सेल्स टॅक्स आयुक्तांना गेमिंग कमिशन म्हणून नियुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“सेल्स टॅक्स कमिशनची गेमिंग कमिशन म्हणून नियुक्ती करण्यात येईल. एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेश मिळणार नाही. गुरुवारी किंवा शुक्रवारी यासंबंधी अधिसूचना जारी होईल” असे सावंत यांनी सांगितले.

गेमिंग कमिशन अस्तित्वात आल्यानंतर कॅसिनो उद्योगाचे नियमन करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतील. मांडवी नदीमध्ये उभ्या असलेल्या बोटींवर सध्या सहा कॅसिनो सुरु आहेत.