Goa Nightclub Fire Case : गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन नाइटक्लबला लागलेल्या आगीत किमान २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर या क्लबचे मालक असलेल्या लुथ्रा बंधूंनी या दुर्घटनेते ते स्वतः पीडित असल्याचे म्हटले आहे. गोल्यातील अप्रोरा येथील समुद्रकिनारी असलेल्या नाइटक्लबमध्ये पार्टी सुरू असताना आग लागली होती, ज्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला.
सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा हे दोघे या नाइटक्लबचे मालक असून ते या आग्निकांडाच्या घटनेची चौकशी सुरू असताना अटक होण्याच्या भीतीने थायलंड येथे पळून गेले आहेत. इतकेच नाही तर भारतात परत येण्यासाठी आणि अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यांच्या याचिकेच लुथ्रा यांनी त्यांच्या याचिकेमध्ये युक्तीवाद केला की, जेव्हा नाइटक्लबमध्ये आग भडकली ते तेथे उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हेगारी दायित्व त्यांच्यावर लादले जाऊ शकत नाही. यासंबंधीचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
लुथ्रा यांचे वकील तनवीर अहमद मीर म्हणाले की, नाइटक्लब हा त्यांचे भागीदार आणि व्यवस्थापक चालवतात. लुथ्रा यांचे तीन बिझनेस पार्टनर्स आहेत, त्यांनी दावा केला ही ते अनेक उद्योग चालवतात आणि ते वैयक्तिक पातळीवर त्यांच्या कोणत्याही फर्मचे दैनंदिन कामकाज ते पाहात नाहीत.
फ्रँचाइज मॅनेजर हे सर्व कामगाज हाताळतात असेही वकीलाने सांगितले. तसेच जेथे आगीची घटना घडली तेथे देखील देखील अशाच स्वरुपात कामकाज चालवले जात होते असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी दावा केला की जर घटना दुसर्या ठिकाणी घडली तर गुन्हेगारी जबाबदारी त्यांच्यावर ठेवली जाऊ शकत नाही. जे दैनंदिन कामकाज पाहतात असे की, पार्टनर्स किंवा मॅनेजर्स यांच्यावर याचे दायित्व असेल असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी ऑपरेशनल मॅनेजर यांना आधीच ताब्यात घेण्यात आल्याचेही यावेळी नमूद केले.
लुथ्रा बंधुंची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथ्रा म्हणाले की एक साधी विनंती आहे की आरोपींना देशात परत येण्याची आणि गोव्यातील स्थानिक न्यायालयात हजर होण्याची परवानगी देण्यात यावी. “ते देखील पीडित आहेत. मी देखील या घटनेमुळे चिंतीत आणि व्यथित झालो आहे,” असेही हे वरिष्ठ वकिल म्हणाले.
दरम्यान सरकारी पक्षाच्या हा खटला सुनावणीसाठी योग्य नाही, असा युक्तीवाद करत या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
