scorecardresearch

Premium

नायजेरिन लोकांमुळे गोव्यातील स्थानिक नागरिक हैराण- पार्सेकर

दिल्लीत अलीकडेच एका आफ्रिकी नागरिकाची निर्घृण हत्या झाली होती.

Laxmikant Parsekar, goa, Nigerians, attack on african in India, racism, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
Goans annoyed with Nigerians : ही गोष्ट सरसकट सर्वच नायजेरियन लोकांना लागू होत नाही. मात्र, एकुणच बघायला गेल्यास गोव्यातील लोकांमध्ये नायजेरियन नागरिकांबद्दल नाराजी असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.

नायजेरिन लोकांचे वागणे, त्यांचा दृष्टीकोन आणि जीवनपद्धतीमुळे गोव्यातील स्थानिक नागरिक हैराण झाल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. ते मंगळवारी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी पार्सेकर यांनी नायजेरियन लोकांसंदर्भात स्थानिकांकडून अनेक तक्रारी येत असल्याचे सांगितले. गोव्यातील स्थानिक लोकांच्या बहुतांश तक्रारी या नायजेरियन नागरिकांबद्दल आहेत. गोव्यात अनेक परदेशी नागरिक येतात. मात्र, गोवेकर नायजेरिन लोकांमुळे खूपच हैराण झाल्याचे पार्सेकर यांनी म्हटले. ही गोष्ट सरसकट सर्वच नायजेरियन लोकांना लागू होत नाही. मात्र, एकुणच बघायला गेल्यास गोव्यातील लोकांमध्ये नायजेरियन नागरिकांबद्दल नाराजी असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
‘काळे’ वास्तव 
दिल्लीत अलीकडेच एका आफ्रिकी नागरिकाची निर्घृण हत्या झाली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी देशातील आफ्रिकी नागरिकांवर होत असलेले हल्ले व त्यांचे वाढत चाललेले प्रमाण याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goans annoyed with nigerians their way of life cm parsekar

First published on: 31-05-2016 at 16:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×