करोना काळात देशात हजारो लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला असताना दुसरीकडे एका अहवालानुसार Gig Economy अर्थात गिग अर्थव्यवस्थेमधून देशात तब्बल ९ कोटी रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपनं प्रसिद्ध केलेल्या अनलॉकिंग द पोटेन्शिअल ऑफ द गिग इकोनॉमी इन इंडिया या अहवालातून हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. ”गिग अर्थव्यवस्था देशातल्या कमी उत्पन्न मिळवणाऱ्या कामगार वर्गासाठी लक्षावधी नोकऱ्यांची निर्मिती करते. गिग अर्थव्यवस्था देशाच्या जीडीपीमध्ये १.२५ टक्के भर टाकत असून तब्बल ९ कोटी रोजगार निर्मिती करण्याची क्षमता या क्षेत्रात आहे’, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

घरगुती स्वरुपाच्या १२ दशलक्ष नोकऱ्या!

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका

ओला, उबर, स्विगी, अर्बनकंपनी यांसारख्या तंत्रज्ञानात्मक प्लॅटफॉर्म्सच्या स्वरूपात गेल्या दशकभरात गिग अर्थव्यवस्थेची प्रचंड वाढ झाली असली, तरी या अर्थव्यवस्थेला अद्याप वाढीसाठी खूप वाव आहे. शेअर्स सर्व्हिसेसमधील सुमारे ५ दशलक्ष नोकऱ्या तसेच घरगुती स्वरूपाच्या १२ दशलक्ष नोकऱ्या नोकऱ्या गिग इकोनॉमीमार्फत निर्माण केल्या जाण्याची शक्यता आहे. यातील बहुतेक नोकऱ्या या MSME आणि घरगुती क्षेत्रांतील आहेत, असंही अहवालात नमूद केलं आहे.

लॉकडाऊन काळात स्थिर वाढ!

“लॉकडाउनच्या काळात भारतभरात गिग कामगारांच्या संख्येत स्थिर वाढ झाल्याचे आम्हाला दिसून आले. ज्या लोकांनी नोकऱ्या गमावल्या होत्या, ते घराजवळ गिग कामाच्या संधी शोधत होते. असंघटित क्षेत्रातील लोकांना नवीन कौशल्ये शिकण्यात मदत करण्याची व त्यांना स्वत:साठी तसेच स्वत:च्या कुटुंबासाठी चांगल्या दर्जाचे आयुष्य प्राप्त करण्यात मदत करण्याची क्षमता गिग अर्थव्यवस्थेत आहे,” असे मायकेल अँड सुसान डेल फाउंडेशनचे इंडिया प्रोग्राम्स संचालक राहील रंगवाला यांनी सांगितले आहे.

करोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊन काळामुळे जगभरात काम करण्याच्या स्वरूपात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच, विकसनशील देशांसोबतच अमेरिकेसारख्या विकसित देशांसमोर देखील बेरोजगारीचं मोठं संकट उभं राहिलेलं असताना गिग अर्थव्यवस्था हा बेरोजगारीवर उपाय ठरण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.