दिवाळीपर्यंत सोनं ३४ हजारांवर ?

यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव प्रतितोळा ३४ हजार रुपयांची कमाल पातळी गाठेल

संग्रहित छायाचित्र

यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव प्रतितोळा ३४ हजार रुपयांची कमाल पातळी गाठेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय भू-राजकीय आव्हानांचा परिणाम यामुळे सोन्याच्या किंमती वाढू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

भारतीय बाजारात दिवाळीमध्ये सोन्याचे भाव ३० हजार ते ३४ हजार रुपये प्रतितोळा राहू शकतात. कॉमट्रेंडज रिस्क मॅनेजमेंटचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही शक्यता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय आव्हानांचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो . याशिवाय भारतीय रुपयाचे अवमूल्यन होत असून डॉलर दिवसेंदिवस बळकट होत आहे. रुपयाच्या या अवमूल्यनाचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत असून दिवाळीपर्यंत यात वाढ होण्याची शक्यता आहे. असं ज्ञानशेखर त्यागराजन म्हणाले. सोन्यात होणाऱ्या गुंतवणुकीत घट झाल्याचे दिसत आहे, कारण शेअर बाजारातून चांगला परतावा मिळतोय त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर याचाही परिणाम होऊ शकतो, असं ते म्हणाले.

कमोडिटी अॅंड करन्सीच्या मॅनेजिंग डायरेक्टर प्रीति राठी यांनी दिवाळीमध्ये सोन्याचे भाव प्रतितोळा ३१,५०० ते ३१,८०० हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gold price may hit 34000 rupee level by diwali