scorecardresearch

मेटा, ट्विटरनंतर गुगलही १२ हजार जणांना नोकरीवरून काढणार, सुंदर पिचाईंची ईमेलद्वारे घोषणा

गुगलची मातृसंस्था असणारी अल्फाबेट ही कंपनी सुमारे १२ हजार जणांना नोकरीवरून काढणार आहे.

मेटा, ट्विटरनंतर गुगलही १२ हजार जणांना नोकरीवरून काढणार, सुंदर पिचाईंची ईमेलद्वारे घोषणा
सुंदर पिचाई (संग्रहित फोटो)

गुगलची मातृसंस्था असणारी अल्फाबेट ही कंपनी सुमारे १२ हजार जणांना नोकरीवरून काढणार आहे. संबंधित कंपनीने जगभरातील एकूण कर्मचार्‍यांपैकी ६ टक्के नोकरीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोकरकपातीचा जागतिक स्तरावर आणि संपूर्ण कंपनीतील कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी एका ईमेलद्वारे नोकरकपातीची घोषणा केली. या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी आपण घेत आहे, असंही पिचाई यांनी ईमेलमध्ये लिहिलं.

हेही वाचा- बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?

मागील काही काळात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मेटा, ट्विटर आणि अ‍ॅमेझॉनसह इतर अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. ढासळती जागतिक अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गुगलनेही नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- गुजरातमधल्या पायाभूत सुविधांसाठी १२,६०० कोटी देणार; नितीन गडकरींची घोषणा

विशेष म्हणजे Google ही सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीत लाखो लोक काम करतात. ही कंपनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात टाळत आहे. परंतु डिजीटल जाहिरातींमध्ये कंपनीला मंदीचा सामना करावा लागत आहे. परिणामी ही नोकरकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा- २१ वर्षे जॉब केल्यानंतर मायक्रोसॉफ्टने नोकरीतून काढलं, कृतज्ञता व्यक्त करत भारतीय व्यक्तीने लिहिलं भावनिक पत्र

पिचाई यांनी ईमेलमध्ये लिहिलं, “आमचं लक्ष्य अधिक स्पष्ट करण्यासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. कंपनीचं भांडवल आणि कंपनीतील वर्कफोर्स योग्य दिशेनं वळवणे हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 18:59 IST

संबंधित बातम्या