scorecardresearch

Premium

Padma Bhushan: सुंदर पिचाईंना ‘पद्म भूषण’ प्रदान; म्हणाले, “मी जिथं जातो, तिथं माझ्यासोबत भारत…”

व्यापार आणि उद्योगातील योगदानासाठी पिचाई यांना या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Google CEO Sundar Pichai is awarded with Padma Bhushan
भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते सुंदर पिचाई यांना 'पद्म भूषण' प्रदान. (फोटो- तरणजीत सिंग संधू ट्विटर)

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ प्रदान करण्यात आला. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात २०२२ या वर्षासाठी पिचाई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “भारत हा माझाच एक भाग आहे. मी जिथं जातो, तिथं भारत माझ्यासोबत असतो”, अशी प्रतिक्रिया यावेळी पिचाई यांनी दिली.

यावर्षीच्या सुरवातीला ‘पद्म भूषण’ पुरस्कारासाठी १७ दिग्गजांची नावं सरकारकडून घोषित करण्यात आली होती. “मी या पुरस्कारासाठी भारतीय नागरिक आणि सरकारचा अत्यंत आभारी आहे. ज्या देशाने मला घडवलं, त्या देशाकडून हा सन्मान मिळणं माझ्यासाठी मोठी बाब आहे”, असं हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ५० वर्षीय पिचाई म्हणाले. “शिक्षण आणि ज्ञानाची आवड असलेल्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो, हे माझं भाग्य आहे. माझ्या आवडीनुसार क्षेत्र निवडता यावं, यासाठी आई-वडिलांनी मोठा त्याग केला”, अशी भावना पिचाई यांनी यावेळी व्यक्त केली.

Chandrasekhar Bawankule
हिंदू धर्म संपवण्याची स्टॅलिन यांची भाषा पवार , ठाकरे , पटोले यांना मान्य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
yuhan force , Norwegian Nobel Prize in Literature to Euan Foss
नॉर्वेच्या युआन फोस यांना साहित्याचे नोबेल
swaminathan
डॉ. स्वामिनाथन यांना अखेरचा निरोप; चेन्नईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Waheeda Rehman conferred with Dadasaheb Phalke Award
दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेल्या वहिदा रेहमान यांनी त्यांच्या चित्रपटांत ‘भारतीय स्त्री’चे चित्रण कसे केले आहे?

Padma Bhushan Award: सत्या नडेला यांना अमेरिकेत ‘पद्म भूषण’ प्रदान, विशेष सेवेसाठी भारताच्या नागरी पुरस्काराने सन्मानित

“गुगल आणि भारत यांच्यातील महान भागीदारी सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत”, असं यावेळी पिचाई यांनी सांगितलं. सॅन फ्रान्सिस्कोतील या पुरस्कार सोहळ्यात भारताचे वाणिज्यदूत टी. व्ही. नागेंद्र प्रसाद यांच्यासह पिचाई यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

गूगलने आणली ‘ऍडव्हान्स सर्च इंजिन’ सेवा; फोटो, व्हिडीओ व माहिती शोधताना कसा कराल वापर?

पिचाई यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून अमर्यादीत शक्यता निर्माण केल्याचं सांगत संधू यांनी त्यांचा गौरव केला. “जगाच्या विविध भागांमध्ये डिजिटल साधने आणि कौशल्ये समाजाच्या सर्व घटकांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ते प्रयत्न करत आहेत”, असं यावेळी संधू म्हणाले. गुगलने यावर्षी मशीन लर्निंगमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भाषांतर सेवेमध्ये आणखी २४ भाषांचा समावेश केला आहे. यामध्ये भारतातील आठ भाषांचा समावेश आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Google ceo sundar pichai is awarded with padma bhushan for 2022 in the trade and industry category in san francisco rvs

First published on: 03-12-2022 at 10:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×