“पेट्रोलचे दर कमी करणारी मशीन मिळाली” ; म्हणत शशी थरूर यांचा मोदी सरकारला टोला!

ट्विट करून त्या मशीनचा फोटो देखील शेअर केला आहे ; जाणून घ्या कोणती आहे ती मशीन आणि काय म्हणाले आहेत शशी थरूर

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पेट्रोल – डिझेलच्या दर वाढीमुळे सध्या सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. शिवाय, काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी देखील ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून इंधन दरवाढीवरून टीका केली आहे.

इंधन दरवाढीवर उपाय किंवा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणारी मशीन म्हणून शशी थरूर यांनी मतदान यंत्राचा फोटो शेअर केला आहे. या फोटो सोबत त्यांनी मजकूर देखील लिहिला आहे.

“आज मिळालं. जोपर्यंत भाजपा केंद्रात सत्तेत आहे तोपर्यंत हे संबंधित आहे.” तसेच, “पेट्रोलचे दर कमी करणारी मशी मिळाली. ही ती मशीन आहे जर तिचा वापर योग्यप्रकारे केला गेला. तर पेट्रोल-डिझेलचे दर अतिशय जलदरित्या कमी होऊ शकतात.” असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

दिवाळीच्या आदल्या दिवशी केंद्र सरकराने एक्साईज टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रत्येकी ४ रुपये आणि ७ रुपयांनी कमी झाल्या. मात्र, विरोधकांकडून मोदी सरकरावर टीका केली जात आहे. केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनंतर आता काँग्रेसशासित राज्य सरकारकांकडून या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे.

“हा तर फक्त लॉलिपॉप”, पेट्रोल-डिझेल दरकपातीवर काँग्रेसनं डागली तोफ!

इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंचीही भाववाढ झाल्याने ऐन सणासुदीत ग्राहकांना महागाईस सामोरे जावे लागत आहे. त्यावरून कॉंगे्रससह विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारला सातत्याने लक्ष्य केले. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत काही ठिकाणी सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Got petrol reduction machine shashi tharoor msr

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या