दूरसंचार विभागाने इंटरनेट सेवा पुरवठादारांना पॉर्नोग्राफीशी संबंधित आणखी ६७ वेबसाईट्स बंद करण्याचा आदेश दिला आहे. माहिती तंत्रज्ञान नियमांचं (Information Technology Rules 2021) उल्लघंन केल्याने दोन उच्च न्यायालयांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

दूरसंचार विभागाने इंटरनेट सेवा देणाऱ्यांना चार पत्रं पाठवली आहेत, ज्यामध्ये एकूण ६७ वेबसाईट्सवर कारवाई कऱण्याचा आदेश आहे. यामधील ६३ वेबसाईट्सवर पुणे उच्च न्यायालयाच्या, तर चार वेबसाईट्सवर उत्तराखंड उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिलेल्या आदेशाच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयानेही (MeitY) यासंबंधी आदेश दिला होता.

Z Category Security to CEC
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा; ‘आयबी’च्या अहवालानंतर केंद्र सरकारचा निर्णय
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
Why Protests in Hong Kong over New National Security Law Approved by Legislative Council Hong Kong
चीनकडून हाँगकाँगची गळचेपी? नवीन सुरक्षा कायद्याविषयी जगभर निषेधसूर का?
supreme court
तथ्यशोधन कक्षाबाबतच्या अधिसूचनेला स्थगिती

दूरसंचार विभागाने आदेशात या वेबसाईट्सवर अश्लील साहित्य असून महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोतवत असून, नियमांचं उल्लंघन केल्याने कारवाई करत असल्याचं सांगितलं आहे. या वेबसाईट्सवर तात्काळ कारवाई करत त्यांना ब्लॉक करण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, काही लोकांनी या वेबसाईट्सवर आपल्या संमतीविना फोटो पोस्ट करण्यात आल्याने तक्रार केल्यानंतर सरकारने ही कारवाई केली आहे का याबाबत स्पष्टता नाही. दूरसंचार विभागानेही यावर भाष्य केलेलं नाही.

कोणत्या पॉर्न वेबसाईट्स बंद करण्यात आल्या आहेत? पाहा संपूर्ण यादी

२०१५ मध्येही सरकारने अशाच पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात ८८ पॉर्न वेबसाईट्सवर कारवाई केली होती. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत या वेबसाईट्सचा उल्लेख होता. कोर्टाने बंदी घालण्याचा कोणताही आदेश दिलेला नव्हता. मात्र भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी इंटरनेट सेवा पुरवठादारांना या साईट्स बंद करण्यास सांगितलं होतं. सरकारने नंतर ही बंदी उठवत फक्त लहान मुलांशी संबंधित पॉर्नवर बंदी असली पाहिजे असं म्हटलं होतं.