करोना प्रतिबंधक उपाययोजनांना ३० नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ

खासकरून सणासुदीच्या काळात करोनाबाबतच्या नियमांचे कदाचित कठोरपणे पालन केले जाणार नाही

nl 3 corona

नवी दिल्ली : देशाच्या काही राज्यांमध्ये करोनाचा स्थानिक स्तरावर फैलाव झालेला असल्यामुळे आणि सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत या रोगाचे आव्हान देशापुढे कायम असल्यामुळे देशभरात करोना रोखण्यासाठी लागू असलेल्या उपाययोजनांची मुदत केंद्र सरकारने ३० नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या लागू असलेले निर्बंध ३० नोव्हेंबपर्यंत कायम राहतील, असे केंद्रीय गृह सचिव अजय भल्लायांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

खासकरून सणासुदीच्या काळात करोनाबाबतच्या नियमांचे कदाचित कठोरपणे पालन केले जाणार नाही अशी शक्यता आहे व त्यामुळे पुरेशी खबरदारी बाळगून व सुरक्षितपणे सण साजरे करण्याची मुभा देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणणे महत्त्वाचे आहे, असे भल्ला यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते.

करोना संसर्गाची दैनंदिन प्रकरणे आणि देशातील रुग्णांची एकूण संख्या हळूहळू कमी होत आहे, मात्र काही राज्यांमध्ये करोनाचा स्थानिक स्तरावर फैलाव झाला असून, सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत या रोगाचे आव्हान देशापुढे कायम आहे, असे भल्ला यांनी सांगितले होते.

राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्य़ातील करोना संसर्गाचा दर, रुग्णालये व आयसीयू खाटांची संख्या यावर नियमितपणे देखरेख ठेवावी, असे गृहसचिवांनी सांगितले.

करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता टाळण्यासाठी आणि सणासुदीचा काळ सुरक्षितपणे पार पडण्याच्या दृष्टीने चाचणी- शोध- उपचार- लसीकरण आणि करोनाविषयक निकषांचे पालन या पाच सूत्री धोरणावर लक्ष केंद्रित असले पाहिजे, असेही भल्ला म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Government extends nationwide containment measures till november 30 zws