सिरमला मोठा धक्का… लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्यास तज्ज्ञांचा विरोध

भारतात कोवोवॅक्स लसींच्या चाचण्यांना मार्च महिन्यापासून सुरुवात झाली आहे. लहान मुलांसाठीच्या चाचण्यांची परवानगी मात्र नाकारण्यात आली आहे.

Adar Poonawalla Serum Institute Of India
सिरम इन्स्टिट्यूटमध्ये 'कोवोव्हॅक्स' लसीच्या उत्पादनाला सुरुवात (Photo- ANI/ Twitter)

सिरम इन्स्टिट्युटच्या कोवोवॅक्स या करोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील चाचणीसाठी परवानगी देण्याचं तज्ज्ञांनी नाकारलं आहे. या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीसाठीची परवानगी नाकारण्यात आली आहे. दोन ते १७ वर्षे वयोगटातल्या मुलांवर चाचणी करण्याची परवानगी सिरम इन्स्टिट्युटने मागितली होती.

सिरमने भारताच्या औषध नियंत्रकांकडे सोमवारी ही परवानगी मागितली होती. सिरमला एकूण ९२० लहान मुलांवर कोवोवॅक्स या करोना प्रतिबंधक लसीची चाचणी करायची होती. त्यापैकी ४६० मुलं १२ ते १७ वर्षे वयोगटातली होती. तर उरलेली २ ते ११ वर्षे वयोगटातली होती. १० ठिकाणी ह्या चाचण्या होणार होत्या.


मात्र भारताच्या औषध नियंत्रक मंडळाच्या तज्ज्ञांच्या समितीने कोवोवॅक्सच्या चाचण्यांना परवानगी नाकारली. ह्या लसीला अद्याप कोणत्याही देशाने लहान मुलांसाठी मान्यता दिली नसल्याचं कारण देण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

हेही वाचा- सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ‘कोवोव्हॅक्स’ लसीच्या उत्पादनाला सुरुवात

करोनावरील ‘कोवोव्हॅक्स’ लसीचं उत्पादन गेल्या आठवड्यापासून सुरु झालं आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोवोव्हॅक्स दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर २०२०मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. २ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Government panel recommends against allowing serum institute of india to conduct phase 2 3 clinical trials of covavax vsk

ताज्या बातम्या