सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास आता १ हजार रु. दंड

सुटी एक सिगरेट विकण्यावर आरोग्यमंत्रालयाने बंदी घातली असून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास आता २०० रुपयांऐवजी १००० रुपये दंड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे

सुटी एक सिगरेट विकण्यावर आरोग्यमंत्रालयाने बंदी घातली असून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास आता २०० रुपयांऐवजी १००० रुपये दंड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे यापुढे सिगरेट ज्यांना विकली जाते त्यांचे वय किमान २१ असावे अशी तरतूद केली आहे. यापूर्वी वयाची अट १८ होती म्हणजे २१ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या ग्राहकालाच यापुढे सिगरेट विकत देता येईल. हॉटेल व रेस्टॉरंट मधील धूम्रपान विभाग काढून टाकण्यात येणार आहे सरकारने याबाबत एका समितीच्या शिफारशी स्वीकारल्या असल्याचे आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले. सिगारेटस अँड अदर टोबॅको प्रॉडक्टस अँड अदर टोबॅको प्रॉडक्टस अमेंडमेंट (सुधारणा) विधेयक २०१५ तयार करण्यात आले आहे. यावर सरकारने जनतेच्या सूचना मागवल्या आहेत. शेतकरी व तंबाखू उद्योगाच्या दबावामुळे सरकार यावर हातपाय गाळेल, अशी भीती होती पण प्रत्यक्षात सरकार खंबीरपणे निर्णय घेत आहे. या विधेयकात कमाल शिक्षा दहा हजार रूपयांवरून एक लाख रूपये करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Government proposes ban on sale of loose cigarettes