सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि पोस्टाच्या बचत योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारने सोमवारी ०.१ टक्क्याने कपात केली. या कपातीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ८.८ टक्क्यांवरून ८.७ टक्के करण्यात आले आहे. येत्या एक एप्रिलपासून नवे व्याजदर लागू होणार आहेत, असे वित्त विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पोस्टाच्या पाच वर्षांच्या मासिक प्राप्ती योजनेवरील व्याजदर ८.४ टक्के करण्यात आले आहे. पाच आणि दहा वर्षे मुदतीच्या राष्ट्रीय बचतपत्रांवरील व्याज अनुक्रमे ८.५ आणि ८.८ टक्के राहणार आहे. त्यामध्ये ०.१ टक्क्याने कपात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवरील व्याजदरही ०.१ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. हे व्याजदर ९.३ टक्क्यांवरून ९.२ टक्के करण्यात आले आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी हे व्याजदर लागू राहणार आहेत.
एक वर्षांपर्यंत पोस्टामध्ये ठेवण्यात येणाऱया मुदतठेवी आणि बचत खाते योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यावरील व्याजदर अनुक्रमे ८.४ आणि चार टक्के राहणार आहे.