फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय) बहुतांश आंदोलक विद्यार्थी हे नक्षलवादी असल्याचे वादग्रस्त विधान करून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी नवा वाद ओढवून घेतला आहे. एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरील व्यक्ती निवडण्याचा सरकारला पूर्णपणे अधिकार आहे. याठिकाणी अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणुकीची पद्धत अस्तित्वात नाही, मग या निर्णयाला विरोध करण्याचा हक्क विद्यार्थ्यांना कुणी दिला, असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केला. यापैकी बहुतेक विद्यार्थी हे नक्षलवादी आहेत, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही आसाममधील विद्यापीठात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून स्थानिक न्यायालयाने भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते.