जगभरात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना भारतात देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार परदेशातून, विशेषत: ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्याहोम क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्हि किंवा निगेटिव्ह आल्यास पुढील कार्यवाहीच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे.

सर्व प्रवाशांना ७ दिवसांचे गृह विलगीकरण!

केंद्राने जारी केलेल्या नियमावलीनुसार, आता भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे हे प्रवासी ओमायक्रॉनबाधित देशांच्या यादीत असो किंवा नसो, त्या सगळ्यांना ७ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावाच लागणार आहे. केंद्राने जारी केलेली नवी नियमावली येत्या ११ जानेवारीपासून अर्थात मंगळवारपासून लागू होणार आहे.

stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा

ओमायक्रॉनबाधित देशांमधील प्रवासी

दरम्यान, ज्या देशांचा समावेश भारतानं ओमायक्रॉन देशांच्या यादीमध्ये केला आहे, अशा देशांमधील प्रवाशांना भारतातील कोणत्याही विमानतळावर उतरल्यानंतर तिथे करोनाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विमान कंपनीला माहिती द्यायची आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तरी त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. मात्र, जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

विमानतळावर उतरल्यानंतर या प्रवाशांना त्यांच्या चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत विमानतळावरच थांबावं लागेल. त्यानंतरच ते त्यांच्या इच्छित स्थळी किंवा पुढच्या कनेक्टिंब फ्लाईटसाठी जाऊ शकतील. जर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, तर त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. आठव्या दिवशी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. या चाचणीचा अहवाल त्यांना एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. संबंधित राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशातील प्रशासन याची खात्री करेल.

चाचणी पॉझिटिव्ह आल्यास…

दुसरी चाचणी जर निगेटिव्ह आली, तर त्यापुढील ७ दिवस त्यांना सतर्क राहण्याबाबत आणि काळजी घेण्याबाबत सांगितलं जाईल. मात्र, जर अशा प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर त्यांचे अहवाल जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येतील. त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करून नियमानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येतील.

“मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही”, महापालिका आयुक्तांचा मोठा दिलासा; निर्बंधांबाबत धोरण केलं स्पष्ट!

अशा प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन ठेवण्यात येईल. यासंदर्भात पूर्ण आणि सत्य माहिती ऑनलाई एअर सुविधा पोर्टलवर देण्याचं आवाहन सरकारनं प्रवाशांना केलं आहे.