मंगळावरील ज्वालामुखीत ग्रॅनाइट सापडले

मंगळावरील अत्यंत जुन्या अशा ज्वालामुखीत वैज्ञानिकांना ग्रॅनाइट सापडले असून पृथ्वीसारखे अग्निजन्य खडक मंगळावर कसे तयार झाले असावेत याबाबत आता एक नवीन सिद्धांत मांडण्यात येत आहे.

मंगळावरील अत्यंत जुन्या अशा ज्वालामुखीत वैज्ञानिकांना ग्रॅनाइट सापडले असून पृथ्वीसारखे अग्निजन्य खडक मंगळावर कसे तयार झाले असावेत याबाबत आता एक नवीन सिद्धांत मांडण्यात येत आहे. मंगळ हा पूर्वी आपण मानत होतो त्यापेक्षा भूगर्भीय संदर्भात फार गुंतागुंतीचा आहे. तेथे ग्रॅनाइट ज्याला फेल्डस्पार असे म्हटले जाते ते खनिज मोठय़ा प्रमाणावर असून ते मंगळावरील एका प्राचीन ज्वालामुखीत सापडले आहेत.
बसाल्ट खडकात जे लोह, मॅग्नेशियम यांनी युक्त असलेले खडक मंगळावर मोठय़ा प्रमाणावर आहेत. पण या ज्वालामुखीच्या ठिकाणी मात्र ते सापडलेले नाहीत. फेल्डस्पार किंवा ग्रॅनाइट किंवा त्याचे स्फोटक रूप असलेले ऱ्होयोलाइट हे खनिज पृथ्वीवर मोठय़ा प्रमाणात आहे. पृथ्वीवरील सबडक्शन झोन येथे टेक्टॉनिक भागात ते सापडते. मंगळावर असे नाही पण तेथे मॅग्मामुळे फेल्डस्पार मोठय़ा प्रमाणात सापडते. मंगळावर ग्रॅनॅटिक खडक आहेत याचे पुरावे मिळाले असल्याचा दावा जॉर्जिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे जेम्स रे यांनी केला आहे. दूरसंवेदन तंत्राच्या मदतीने मंगळावर ग्रॅनाइट या ज्वालामुखीच्या परिसरात जास्त असल्याचे समजले असून त्यात वर्णपंक्तीशास्त्राचाही वापर करण्यात आला आहे. हा ज्वालामुखी अब्जावधी वर्षे धुमसत होता. तो धूळरहित असून अभ्यासासाठी अतिशय योग्य आहे. त्याच्या आतमध्ये फेल्डस्पार म्हणजे ग्रॅनाईट सापडले आहे. अवरक्त वर्णपंक्तीशास्त्राच्या मदतीने निरीक्षण करताना फेल्डस्पार हे जास्त असल्याशिवाय त्याचे अस्तित्व समजू शकत नाही. बसाल्ट खडकात असतात तशी गडद खनिजे यात शोधणे अवघड असते. मॅग्मा म्हणजे लाव्हारस जसा उपपृष्ठावर थंड होत गेला तशी त्याची घनता कमी होत गेली व त्याचे स्फटिक तयार झाले. या प्रक्रियेला फ्रॅक्शनायझेशन असे म्हणतात, ग्रॅनाइट तयार होईपर्यंत ती चालू राहते.  प्रदीर्घ काळ धुमसत राहणाऱ्या ज्वालामुखीतच ते तयार होऊ शकते असे सादृश्यीकरण प्रयोगात सहभागी असलेल्या स्कूल ऑफ अर्थ अँड अ‍ॅटमास्फेरिक सायन्सेसचे जोसेफ डय़ुफेक यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Granite discovered on mars created over billions of years in volcanoes

ताज्या बातम्या