मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. दीर्घकाळ पंतप्रधानपदी राहिलेल्या नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी जाऊन बसले आहेत. यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या पंतप्रधानपदी दीर्घकाळ आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. तसंच नेतन्याहू यांनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे.

नेत्यानाहू यांनी काय म्हटलंय?

बिन्यामिन नेतान्याहू यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. भारताच्या पंतप्रधानपदी दीर्घकाळ सेवा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन. मोदी तुम्ही माझे मित्र आहात मी तुमचं अभिनंदन करतो असं नेतान्याहू म्हणाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलंय?

माझे मित्र नरेंद्र मोदी तुम्ही पंतप्रधानपदाची १२ वर्षे पूर्ण केली आहेत. मी तुमचं अभिनंदन करतो. नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत, तसंच ते एक शक्तिशाली नेते आहेत, पण तेवढेच समजूतदार नेतेही आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. या आशयाची पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

जॉर्जिया मेलोनी यांनीही केलं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक जॉर्जिया मेलोनी यांनीही केलं आहे. आमची नुकतीच रोममध्ये भेट झाली होती. तुम्हाला दुसऱ्यांदा भेटले आणि आपण एक रणनितीक भागिदारीची सुरुवात केली, याचा मला विशेष आनंद आहे. आपल्या देशांचे परस्पर संबंध जनतेसाठी नव्या संधी निर्माण करतील याची मला खात्री आहे. नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कारकिर्दीबाबत शुभेच्छा, या आशयाची पोस्ट मेलोनी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारची १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील १२ वर्षांच्या कारकिर्दीबाबत नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. देशातले २५ कोटी लोक हे दारिद्य्ररेषेच्या बाहेर आले आहेत ही आशा निओ मिडल क्लासला आणखी धीर देणारी ठरली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच एनडीएच्या नेतृत्वात जी १२ वर्षे देशाने पाहिली त्यामुळे देशाचं भाग्य बदललं असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कारकिर्दीचे ४ हजार ९९९ दिवस पूर्ण केले आहेत. त्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.