बिहार निवडणूक चिन्हांमध्ये मिर्ची, टेलिफोनचा समावेश

हिरवी मिर्ची, कोबीचे फूल, टेलिफोन, आईस्क्रीम, बूट, चप्पल, बादली.. एखाद्या अंकलिपीतील ही चित्राक्षरे असावीत असे कदाचित तुम्हाला वाटेल.

हिरवी मिर्ची, कोबीचे फूल, टेलिफोन, आईस्क्रीम, बूट, चप्पल, बादली.. एखाद्या अंकलिपीतील ही चित्राक्षरे असावीत असे कदाचित तुम्हाला वाटेल. पण प्रत्यक्षात बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नोंदणीकृत परंतु मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांना देण्यात आलेली ही निवडणूक चिन्हे आहेत! ही चिन्हे जितकी रोचक आहेत, तितकीच निवडणुकीच्या मैदानातील काही पक्षांची नावेही मनोरंजक आहेत. आप और हम पार्टी, नॅशनल टायगर पार्टी, राथी और आपका फैसला अशी  काही पक्षांची चित्रविचित्र नावे आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Green chilli ice cream are election symbols in bihar polls

ताज्या बातम्या