scorecardresearch

खळबळजनक! पाच जणांनी पकडलं, एकाने नऊ वेळा डोक्यात दगड घातला; ३० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून

या खूनानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.

खळबळजनक! पाच जणांनी पकडलं, एकाने नऊ वेळा डोक्यात दगड घातला; ३० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून
नांदण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार ; हडपसर भागातील घटना (संग्रहित छायचित्र)

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीस वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. सहा जणांनी या तीस वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. या खूनाचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या खूनानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बंगळुरूतील केपी अग्रहारा परिसरात ही घटना घडली आहे. यामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचे नाव बाळाप्पा आहे. तर, सहा आरोपीमध्ये तीन महिला आणि तीन पुरूष असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.

हेही वाचा : “बाबा दुचाकीसाठी सासरचे लोकं मला…”, मृत्यूपुर्वी मुलीची वडिलांना साद

याबाबत ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, ४ डिसेंबरच्या रात्री केपी अग्रहारा परिसरात काही जण चर्चा करत होते. तेव्हा काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला. यातील पाच जणांनी बाळाप्पा याला खाली पाडले. तर, दुसऱ्या महिलेने जवळ असलेला दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. त्यानंतर आणखी एका व्यक्तीने नऊवेळा डोक्यात दगड घातल्याने बाळाप्पाचा मृत्यू झाला. यानंतर घटनेनंतर सर्व आरोपींनी तेथून पळ काढला आहे.

हेही वाचा : “आधी कॅमेरा…”, पंतप्रधान मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करत अभिनेते प्रकाश राज यांचं खोचक ट्वीट!

ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन विशेष पथके तयार केली आहे. त्यांचा शोध बंगळुरू पोलिसांकडून घेतला जात आहे. “३० वर्षीय एका व्यक्तीचा केपी अग्रहारा येथील हेमंत मेडिकलसमोर रात्री १२.३० च्या सुमारास खून करण्यात आला. यामध्ये तीन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे,” अशी माहिती पश्चिम बंगळुरूचे पोलीस आयुक्त यांनी ‘इंडिया टुडे’ला दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:25 IST

संबंधित बातम्या