१७७ वस्तूंवरील जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर

यापूर्वी जीएसटी परिषदेने १०० हून अधिक वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला होता.

GST Council meeting Live Updates , Only 50 items to remain in top 28 per cent bracket , Finance Minister Arun Jaitley, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
GST Council meeting : जीएसटी दर कमी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये डिओ, शॅम्पू आणि सौंदर्य प्रसाधनांचा समावेश आहे. तर २८ टक्के इतका कर कायम ठेवण्यात आलेल्या वस्तुंच्या यादीत तंबाखू, सिगारेट आणि चैनीच्या गोष्टींचा समावेश आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आसाम येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी कररचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यानुसार दैनंदिन वापरातील १७७ वस्तूंवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करण्यात आला आहे. तर ५० वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी जीएसटी परिषदेने १०० हून अधिक वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला होता. जीएसटी दर कमी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये डिओ, शॅम्पू आणि सौंदर्य प्रसाधनांचा समावेश आहे. तर २८ टक्के इतका कर कायम ठेवण्यात आलेल्या वस्तुंच्या यादीत तंबाखू, सिगारेट आणि चैनीच्या गोष्टींचा समावेश आहे. अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आणि २४ राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत गुवाहटी येथे आज जीएसटी परिषदेची बैठक झाली. जीएसटी लागू झाल्यानंतर या नव्या करप्रणालीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gst council meeting live updates only 50 items to remain in top 28 per cent bracket

ताज्या बातम्या