जुलै जीएसटी कलेक्शन १ लाख कोटी पेक्षा जास्त, गेल्या जुलैच्या तुलनेत ३३ टक्के वाढ

जुलै महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत १ लाख १६ हजार ३९३ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.

GST
जुलै जीएसटी कलेक्शन १ लाख कोटी पेक्षा जास्त, गेल्या जुलैच्या तुलनेत ३३ टक्के वाढ (संग्रहित फोटो)

सलग आठ महिने जीएसटी कलेक्शन एक लाख कोटींच्या पार जमा होत होता. मात्र गेल्या महिन्यात जीएसटीचं कलेक्शन १ लाख कोटींच्या खाली जमा झालं होतं. मात्र या महिन्यान पुन्हा एकदा जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. जुलै महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत १ लाख १६ हजार ३९३ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. यात राज्याची कर रक्कम २८ हजार ५४१ कोटी आणि केंद्राचा वाटा २२ हजार १९७ कोटी आहे. तर एकीकृत जीएसटी ५७ हजार ८६४ कोटी आहे. एकीकृत जीएसटीत २७ हजार ९०० कोटी आयातीच्या माध्यमातून आले आहेत. तर उपकर ७ हजार ७९० कोटी जमा झाला आहे. ८१५ कोटी आयतीवरील उपकरातून मिळाला आहे. जीएसटीची रक्कम १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान जीएसटीआर-३ बी च्या माध्यमातून जमा झाला आहे.

जुलै २०२० च्या तुलनेत ३३ टक्के अधिक कर जमा झाला आहे. जुलै २०२० मध्ये जीएसटी ८७ हजार ४२२ कोटी जमा झाला होता. त्यात केंद्राचा वाटा १६ हजार १४७ कोटी, तर राज्याचा वाटा २१ हजार ४१८ कोटी होता. तर एकीकृत जीएसटी ४२ हजार ५९२ कोटी रुपये इतका होता.

जुलै २०२१ महिन्यात जीएसटी ९२ हजार ८४९ कोटी जमा झाला होता. त्यात केंद्राचा वाटा १६ हजार ४२४ कोटी, राज्याचा वाटा २० हजार ३९७ कोटी आणि आयजीएसटी ४९ हजार ७९ कोटी इतका होता. करोनाची दुसरी लाट आणि लॉकडाउन यामुळे जून महिन्यात जीएसटी संकलनात घट झाल्याचं समोर आलं आहे. मात्र जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा जीएसटीत वाढ होताना दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gst hike of 33 percent in july collection again crosses rs 1 lakh crore rmt

ताज्या बातम्या