गुजरात बोर्डातील बारावीच्या तब्बल ९५९ विद्यार्थींनी सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थांच्या उत्तरपत्रिकेत ऐवढे साम्य आहे की, ९५९ विद्यार्थांची उत्तरे आणि चुकाही सर्वांच्या एकसारख्या आहेत. यांच्या उत्तरपत्रिका पाहून आधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला. गुजरात बोर्डाच्या इतिहासात सामूहिक प्रमाणात कॉपी करण्याचे हे आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे.

कॉपीबहद्दरांवर कडक कारवाई करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असताना हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे शिक्षणक्षेत्रात गदारोळ माजला आहे. या सर्व विद्यार्थांचा निकाल २०२० पर्यंत स्थगित करण्यात आला असून ज्या विषयात विद्यार्थांनी कॉपी केली त्या सर्व विषयात त्यांना नापास करण्यात आले आहे.

ज्या केंद्रावरून कॉपी करण्याची तक्रार आली होती तेथील सर्व उत्तरपत्रिका तपासल्या असता हा प्रकार समोर आला. ही सर्व केंद्रे जूनागढ आणि गिर-सोमनाथ जिल्ह्यातील असल्याचे आधिकाऱ्याने सांगितले.

गुजरात बोर्डामधील एका सुत्राने सांगितले की, ९५९ विद्यार्थांनी एका प्रश्नाचे उत्तर एकसारखे लिहले होते. या विद्यार्थांच्या उत्तराचा क्रमही एकच होता. त्याचप्रमाणे सुर्वांच्या चुकाही एकसारख्याच होत्या.

‘बेटी परिवार का चिराग है’ या निबंध २०० विद्यार्थांनी एकसारखाच लिहिला होता. ज्या विषयातील सामूहिक कॉपीचा प्रकारसमोर आला त्यामध्ये अकाउंट, अर्थशास्त्र, गणित आणि इंग्रजीचाही समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले.