गुजरातल्या कच्छ जिल्ह्यातील जाखुआ भागात भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत, १ कोटींपेक्षा जास्त किंमत असलेला चरसचा साठा जप्त केला आहे. Deputy Commandant अनुराधा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत तटरक्षक दलाने चरस या अमली पदार्थाची ८८ पाकीटं जप्त केली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत सुमारे १ कोटी ३२ लाखांच्या घरात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अनुराधा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली तटरक्षक दलाचं पथक जाखुआ बेटांजवळ गस्त घालत होतं. यादरम्यान बेटावर तटरक्षक दलाच्या जवानांना काही पाकीट सापडली. पाकीटातील या पदार्थाची चाचणी केल्यानंतरत हे चरस असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर परिसरात आणखी तपास केला असता तटरक्षक दलाला चरसची ८८ पाकीट सापडली. हा सर्व माल तटरक्षक दलाने मरीन पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. बेटावर अमली पदार्थांचा इतका मोठा माल कुठून आला याचा तपास सध्या मरीन पोलीस आणि तटरक्षक दल करत आहेत.