गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. भाजपाने गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत काही जागांची विशेष चर्चा होत आहे. यामध्ये जामनगर उत्तर मतदारसंघाचे नाव प्रामुख्याने घेता येईल. या मतदारसंघातून भाजपाने क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र जडेजाचे वडील मात्र काँग्रेसचा प्रचार करताना दिसत आहेत. जडेजाची बहीण आणि काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख नैनाबा जडेजा यादेखील काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार करताना दिसत आहेत. यावरच आता रिवाबा जडेजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>>> चुनावी हिंदू: राहुल गांधींच्या महाकाल मंदिर भेटीचा भाजपानं जोडला गुजरात निवडणुकीशी संबंध

Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”
VAishali Darekar on shrikant shinde
श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर; ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर म्हणाल्या, “एकवेळ चौक कमी पडतील…”
Sanjay Nirupam
ठाकरे गटाच्या उमेदवार यादीमुळे संजय निरुपम बंडखोरीच्या पवित्र्यात? काँग्रेसला इशारा देत म्हणाले…
You cannot grow up without struggle says Pratibha Dhanorkar
“संघर्ष केल्याशिवाय मोठे होता येत नाही…” काय म्हणाल्या प्रतीभा धानोरकर

“ही निवडणूक जिंकणे माझ्यासाठी आवघड नाही. एकाच कुटुंबातील सदस्यांची वेगवेगळी विचारधारा असू शकते. माझे सासरे त्यांच्या पक्षातील उमेदवार विजयी व्हावा म्हणून प्रचार करत आहेत. एकाच कुटुंबातील लोक वेगवेगळ्या पक्षात सक्रिय असतात. त्यामुळे हे सगळं पहिल्यांदाच घडतंय असं नाही. लोक भाजपाला पाठिंबा देत आहेत,” असे रिवाबा जडेजा म्हणाल्या आहेत.

रवींद्र जडेजाच्या वडिलांकडून काँग्रेसचा प्रचार

हेही वाचा >>>> Gujarat Election 2022 : सोशल मीडियावरील प्रचारात भाजपा पिछाडीवर! आप सर्वांत पुढे; काँग्रेसचे प्राधान्य ‘भारत जोडो यात्रे’ला

रवींद्र जाडेजाच्या पत्नी रिवाबा जाडेजा यांना भाजपानं उमेदवारी दिलेली आहे. रिवाबा यांचा विजय व्हावा म्हणून रवींद्र जडेजादेखील पूर्ण ताकदीने प्रचार करत आहे. मात्र जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जाडेजा काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. रिवाबा यांना ज्या जागेवर उमेदवारी देण्यात आली, त्याच जागेवर काँग्रेसमध्ये असणाऱ्या जाडेजाची बहीण नैनाबा जडेजा इच्छुक होत्या. मात्र रिवाबा यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नैनाबा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. याच कारणामुळे नैनाबा यादेखील रिवाबा यांच्याविरोधात प्रचार करताना दिसत आहेत.

हेही वाचा >>>> “या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांचं भलं झालं का?”, इस्रायली दिग्दर्शकाच्या टीप्पणीनंतर खोऱ्यातील नेत्यांच्या उमटल्या प्रतिक्रिया

दरम्यान, आज गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण ८९ जागांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात रिवाबा यांच्यासह ७८८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. २०१७ साली उत्तर जामनगरमधून निवडून आलेले भाजपाचे धर्मेंद्र सिंग जडेजा यांना पक्षाने तिकीट नाकारत रिवाबा यांना संधी दिली आहे.