scorecardresearch

Premium

जामीन मिळूनही भोगावा लागला तीन वर्षांचा तुरुंगवास, ई-मेलमधील ‘ती’ एक चूक अधिकाऱ्यांना पडली महागात

या प्रकरणात तुरुंग अधिकारी दोषी असून १४ दिवसांत चंदन ठाकूर याला १ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे गुजरात उच्च न्यायालायने आदेश दिले आहेत.

prisoner suffered stroke Yerawada Jail died treatment pune
गुजरात उच्च न्यायालायने तुरुंग अधिकाऱ्यांना फटकारले (प्रातिनिधिक छायाचित्र)

आरोपीला जामीन मिळाल्याचा मेल तुरुंग अधिकाऱ्यांना उघडता आला नाही, यामुळे संबंधित आरोपीला तीन वर्षांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागली असल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी संबंधिताला १ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालायने दिले आहेत.

२७ वर्षीय युवक चंदन ठाकूर हत्येच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. परंतु, २०२० मध्ये त्याची शिक्षा कमी करण्यात आली आणि त्याला जामीन देण्यात आला. परंतु, जामीन मिळाल्यानंतरही चंदनची ठाकूर तीन वर्षे तुरुंगात शिक्षा भोगत होता.

Buldhana Cyber ​​Police arrested two Nigerian nationals Delhi online fraud
ऑनलाईन ६५ लाखांची फसवणूक; दोन ‘नायजेरियन’ युवकांना दिल्लीतून घेतले ताब्यात
Eknath Nimgade murder case
नागपूर : एकनाथ निमगडे हत्याकांडाचा अहवाल सीबीआय न्यायालयात करणार सादर
pune district office
मर्जीतील अधिकाऱ्यांवरून दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये जुंपली; पुणे जिल्हा प्रशासनामध्ये अस्वस्थता
rahul narvekar eknath shinde uddhav thackrey
आमदार अपात्रता सुनावणी तीन आठवडे लांबणीवर; तात्काळ निर्णय देण्याची ठाकरे गटाची मागणी

चंदन ठाकूर याला जामीन मिळाल्याचा मेल रजिस्ट्रीद्वारे तुरुंग अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. २०२० मध्ये त्याला जामीन मिळाला होता. परंतु, त्यावेळी कोरोना निर्बंध असल्याने तुरुंग अधिकारी अधिक कार्यवाही करू शकले नाहीत. तसंच, तुरुंग अधिकाऱ्यांना मिळालेल्या मेलमध्ये असलेली अटॅचमेंट फाईल तुरुंग अधिकारी उघडू शकले नाहीत. त्यामुळे चंदन ठाकूरच्या जामीनाची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली नाही. परिणामी, चंदन ठाकूरला अतिरिक्त शिक्षा भोगावी लागली.

गुजरात उच्च न्यायालायने म्हटलं की, तुरुंग अधिकाऱ्यांना जामिनाचा मेल प्राप्त झाला नाही, असं नाही. परंतु, कोविड महामारीमुळे तुरुंग अधिकाऱ्यांना कार्यवाही करता येत नव्हती. त्यांना मेल मिळाला होता, परंतु, मेलमध्ये असलेली फाईल ते उघडू शकले नाहीत. याचिकाकर्त्याला जामीन मिळाला होता. त्यामुळे तो त्याच्या जगण्याचा आनंद घेऊ शकत होता. परंतु, त्याला तीन वर्षे तुरुंगात राहावे लागले. रजिस्ट्रीने पाठवलेल्या मेलसंदर्भातील तक्रारीविषयी तुरुंग अधिकाऱ्यांनी रजिस्ट्री किंवा सत्र न्यायालयाशी संपर्क साधला नाही.”

परिणामी, या प्रकरणात तुरुंग अधिकारी दोषी असून १४ दिवसांत चंदन ठाकूर याला १ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे गुजरात उच्च न्यायालायने आदेश दिले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gujarat hc grants 1 lakh compensation to man who spent 3 years in jail as authorities couldnt access his bail order sent on e mail sgk

First published on: 27-09-2023 at 19:24 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×