Gujarat riot case: नरेंद्र मोदींना क्लीन चीट देणाऱ्या निकालाविरोधात याचिका, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

नरेंद्र मोदींना क्लीन चीट देणाऱ्या निकालाविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

supreme court email ad pm narendra modi image nic
(फाईल फोटो)

२००२ च्या गुजरात दंगलीत तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर उच्च पदस्थांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाला आव्हान देणारी याचिका झाकिया अहसान जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी सुरू केली आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल याचिकाकर्त्या झाकिया जाफरी यांची बाजू मांडत आहेत.

झाकिया जाफरी या २००२ च्या गुजरात दंगलीत गुलबर्ग हाउसिंग सोसायटी हत्याकांडात मारले गेलेले काँग्रेस आमदार एहसान जाफरी यांची विधवा झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत विशेष याचिकेद्वारे एसआयटीच्या अहवालाला आव्हान दिले आहे. गोध्रा हत्याकांडानंतर जातीय दंगली भडकावण्यासाठी वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी मोठा कट रचला होता, असं त्यांनी म्हटलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gujarat riot case plea by zakia jafri challenging clean chit to then gujarat cm narendra modi and others hrc

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका