* मोदींविरोधातल्या सर्वोच्च न्यायालातील याचिकेवर डिसेंबरमध्ये सुनावणी
२००९ मध्ये गुजरातमधील एका वास्तुरचनाकार महिलेवर पाळत ठेवल्याचा ‘कोब्रा पोस्ट’च्या आरोपानंतर मोदी प्रशासनाचे कट्टर विरोधक निलंबीत आएएस अधिकारी प्रदिप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाची दखल घेण्याची याचिका दाखल केली.
या याचिकेवर येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.
नेमके काय आहे हे प्रकरण? –
२००९ मध्ये नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा यांनी पदाचा गैरवापर करत ‘साहेबां’च्या आदेशावरून, पोलीस यंत्रणेचा वापर एका युवतीवर ‘लक्ष’ ठेवण्यासाठी अवैध पद्धतीने केला होता, असे आरोपकर्त्यांचे म्हणणे आहे.
आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ, अमित शहा आणि गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी जी.एल. सिंघल या दोघांमधील सुमारे अर्ध्या तासाचे दूरध्वनी संभाषणाचे ध्वनिमुद्रण आरोपकर्त्यांनी सादर केले आहे.
‘साहेबां’साठी युवतीवर ‘लक्ष’
या प्रकरणाची दखल घेऊन या ध्वनिमुद्रणाच्या टेप्सची न्यायालयाने शहानिशा करावी अशी याचिका प्रदिप शर्मा यांनी दाखल केली होती. यावर आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.