kantilal shivlal amrutiya Morbi: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांआधीच घडलेल्या मोरबी पूल दुर्घटनेची देशभरामध्ये चर्चा झाली. या मतदरासंघातून भारतीय जनता पार्टने कांतिलाल शिवलाल अमृतिया यांना तिकीट देण्यात आलं. मोरबी दुर्घटनेनंतर अपघातग्रस्त लोकांच्या मदतीला धावलेल्या कांतिलाल यांनी अनेकांचे प्राण वाचवले. या मदतीमुळे कांतिलाल हे संपूर्ण देशभरामध्ये चर्चेत होते. दुपारी १२ पर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार कांतिलाल हे काँग्रेसच्या जंयती पाटेल यांच्यापेक्षा सहा हजार अधिक मतं घेऊन आघाडीवर आहेत. मोरबी मतदारसंघ कच्छ जिल्ह्यामध्ये येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१७ मध्ये मोरबी मतदारसंघामध्ये काँग्रेसची सत्ता होती. याच मतदारसंघामधून आम आदमी पार्टीचे उमेदवार पंकज रनसरिया यांना चार हजार ३०० मंत मिळाली आहेत. कांतिलाल शिवलाला अमृतिया यांना दुपारी १२ पर्यंत २१ हजार ७७५ मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या जंयती पटेल यांना १५ हजार ४९८ मतं मिळाली आहेत. आतापर्यंत १० वेळा या मतदारसंघामध्ये भाजपाने विजय मिळवला आहे.

सन २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते ब्रिजेश मेरजा हे या मतदारसंघामधून जिंकले होते. सन १९८० ते २०२० दरम्यान झालेल्या १० निवडणुका आणि पोटनिवडणुकांपैकी सात निवडणुकींमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने १९८० आणि २०१७ मध्ये या ठिकाणी विजय मिळवला होता. यंदा आम आदमी पार्टीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे यंदा निवडणूक तिरंगी होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्राथमिक कल पाहता या ठिकाणी भाजपा विजयी होईल अस चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> Himachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भिती; सर्व विजयी उमेदवारांना…

ऑक्टोबर महिन्यात मच्छु नदीवरील पूल कोसळल्याने १३० जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कांतिलाल शिवलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारुन लोकांचे प्राण वाचवले होते. सोशल मीडियावर कांतिलाल यांनी मदत केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. कंबरेला लाइफ ट्यूब बांधून लोकांचे प्राण वाचवणारे कांतिलाल यांचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतरच त्यांचं नाव चर्चेत आलं आणि त्यांना भाजपाने तिकीट दिलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat election morbi assembly seat result bjp kantilal shivlal amrutiya scsg
First published on: 08-12-2022 at 13:02 IST