scorecardresearch

Premium

“१७ वर्षांच्या मुलीही बाळांना जन्म देऊ शकतात, मनुस्मृती…” बलात्कार पीडितेच्या वकिलाला उद्देशून काय म्हणाले न्यायमूर्ती?

गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नेमकं कायम म्हणाले?

Gujrat High court Judge
बलात्कार पीडितेच्या वकिलांना मनुस्मृती वाचा असं काय म्हणाले जज?

गुजरातमध्ये १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर ती गरोदर राहिली. बलात्कार पीडिता सध्या सात महिन्यांची गरोदर आहे. गुजरात उच्च न्यायालयात तिच्या गर्भपाताला संमती मिळावी म्हणून याचिका दाखल करण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाविषयी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती समीर जे. दवे यांनी तोंडी मत नोंदवतना असं म्हटलं की, “जुन्या काळात १४-१५ व्या वर्षी लग्न होणं ही अत्यंत सामान्य बाब होती. मुलगी १७ वर्षांची होईपर्यंत तिला मूलही होत असे. तुम्ही वाचणार नाही हे माहित आहे. तरीही सांगतो एकदा मनुस्मृती काय सांगते वाचा.”

१७ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिच्या वडिलांना जेव्हा समजलं की ती गरोदर राहिली आहे तोपर्यंत सात महिने झाले होते. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी गर्भपातासाठी संमती मिळावी म्हणून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. वरिष्ठ वकील सिकंदर सय्यद हे या मुलीच्या वडिलांची बाजू मांडत आहेत. त्यांनी मेडिकल टर्मिनेशनचा मुद्दा उचलून धरला.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

जस्टिस समीर दवे काय म्हणाले?

याबाबत तोंडी मत व्यक्त करताना जस्टिस समीर दवे असं म्हणाले की “जुन्या काळात १४-१५ व्या वर्षी मुलीचं लग्न होणं आणि १७ व्या वर्षी तिला मूल होऊन ती एका मुलाची आई होणं ही अगदी सामान्य बाब होती. मनुस्मृती वाचा तुम्हाला कळेल.” दुसरीकडे वरिष्ठ वकील सैय्यद यांनी या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी असं म्हटलं आहे. १८ ऑगस्टला या मुलीला प्रसूतीची तारीख डॉक्टरांनी दिली आहे. मात्र गर्भपातासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने असं म्हटलं आहे की पीडिता आणि तिच्या पोटात वाढणारं बाळ या दोघांची प्रकृती व्यवस्थित असेल तर गर्भपाताची संमती दिली जाणार नाही. टाइम्स ऑफ इंडियाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

गुजरात न्यायालयाने दिले मेडिकल चाचणीचे आदेश

या प्रकरणात पीडितेची मेडिकल तपासणी करण्यात यावी असे आदेश गुजरात न्यायालयाने दिले आहेत. कोर्टाने राजकोट सरकारी रुग्णालयचे मुख्य अधिष्ठाता यांना हे निर्देशही दिले आहेत की मुलीची चाचणी तातडीने डॉक्टरांच्या एका पॅनलकडून करण्यात यावी. उच्च न्यायालयाने पीडितेच्या वडिलांना हे सांगितलं आहे की डॉक्टरांचं पॅनल काय निर्णय देतं? त्यांचा अहवाल काय असेल त्यावर आम्ही गर्भपाताची संमती द्यायची की नाही ते ठरवू. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. मात्र गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मनुस्मृतीचं उदाहरण देत काढलेले उद्गार सध्या चर्चेत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gujrat high court on minor girl abortion plea girls use to give birth by 17 read manusmriti scj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×