scorecardresearch

ज्ञानवापी मशीद प्रकरणी पुढील सुनावणी २६ मे रोजी

सुनावणी दरम्यान न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ज्ञानवापी प्रकरणी वारणसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे रोजी पार पडणार आहे. मुस्लिम पक्षाच्या बाजूच्या याचिकेवर ७ -११ सीपीसी अंतर्गत याचिकांवर न्यायालय पुढील सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायायाकडे प्रवर्ग

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायायाकडे प्रवर्ग करण्यात आली होती. दरम्यान, न्यायमूर्तींनी अ‍ॅडव्होकेट कमिशनरच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालावर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पक्षांकडून आक्षेप मागवले आहेत. सर्वेक्षण अहवालावर आक्षेप मागवायचे की मशीद समितीच्या आदेश नियम ७-११ अर्जावर आधी सुनावणी घ्यायची याबाबत न्यायालय आज आदेश देणार होते. सुनावणीदरम्यान खटला प्रार्थनास्थळ कायद्यांतर्गत प्रतिबंधित असल्याचा युक्तिवाद मस्जिद समितीने केला आहे. तर हिंदू याचिकाकर्त्यांनी सर्वेक्षण अहवालाचा विचार केला पाहिजे असे म्हटले आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

या सुनावणी दरम्यान न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान केवळ पक्षकार आणि वकिलांनाच न्यायालयात प्रवेश देण्यात येत होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gyanvapi mosque case next hearing may 26 district court order dpj