पश्चिम दिल्लीतील टिळक नगर भागात घडलेल्या २१ वर्षीय मुस्कानच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. या हत्येप्रकरणातील आरोपी इम्रान (वय २३) सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत होते, आता याच इम्रानला अटक करण्यात आली आहे.इम्रान पोलिसांना पाहून पळून जात होता. ज्यानंतर पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. पण त्याने ऐकून घेतलं नाही, तसंच तो पोलिसांना शरण आला नाही. दिल्लीतल्या राजौरी गार्डन या ठिकाणी तो होता, इम्रान पळ काढत असताना पोलिसांनी त्याच्या पायांवर गोळ्या झाडल्या आणि त्याला खाली पाडत अटक केली. त्याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्याने त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

२१ वर्षीय मॉडेलची तिच्या राहत्या घरी हत्या

२१ वर्षीय मॉडेल मुस्कानची तिच्या घरी हत्या करण्यात आली. या प्रकरणात तिचा जिम ट्रेनर आरोपी असून पोलीस त्याच्या मागावर होते. आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. राजौरी गार्डन या ठिकाणी इम्रान आहे हे पोलिसांना कळलं होतं. सुरुवातीला पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. ज्यानंतर त्याच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडून त्याला जखमी करण्यात आलं आणि मग पोलिसांनी त्याला अटक केली. इम्रान सध्या पोलिसांच्या अटकेत असून पोलीस बंदोबस्ताखालीच त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुधवारी नेमकं काय घडलं?

बुधवारी संध्याकाळी साधारण सहाच्या सुमारास इम्रान मुस्कानच्या घरी पोहोचला. तिची आई भाजी आणण्यासाठी बाहेर गेली होती, तर दोन बहिणी कामानिमित्त चंदीगढला गेल्या होत्या. घरात मुस्कान एकटीच होती. दरवाजा जबरदस्तीने उघडला गेला किंवा कुठली झटापट झाली अशी काहीही चिन्हं पोलिसांना आढळली नाहीत. मुस्कान त्याला ओळखत होती म्हणूनच तिने त्याला घरात घेतलं असावं.घरात प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात इम्रानने आधी मुस्कानचा गळा आवळला आणि सोबत आणलेल्या सुऱ्याने तिच्या पोटावर वार केले. तिची हत्या केल्यानंतर तो तिचा मोबाईल घेऊन फरार झाला, पण पोलिसांनी इम्रानला अटक केली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

इम्रानने मुस्कानवर चाकूचे वार केले आणि तिला ठार केलं

मुस्कान नावाची २१ वर्षीय मॉडेल दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या टिळक नगरमधील एका इमारतीत राहत होती. तिच्या घरी जाऊन जिम ट्रेनर इम्रानने तिच्यावर चाकूचे वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. इम्रान पळ काढत असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलीस आता या प्रकरणात इम्रानचा शोध घेत आहेत. मुस्कान ही मॉडेल होती आणि विद्यार्थिनीही होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तिला मारल्यानंतर इम्रान तिथून पळून गेला होता. त्याचं पळतानाचं फुटेज पोलिसांना मिळालं होतं.