संतापजनक! ५ विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, कृत्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर केला शेअर | haidrabad five classmate sexually assaulting 17 year old girl | Loksatta

संतापजनक! ५ विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, कृत्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर केला शेअर

तेलंगाणा राज्यातील हैदराबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे

संतापजनक! ५ विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, कृत्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर केला शेअर
सांकेतिक फोटो

तेलंगाणा राज्यातील हैदराबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या १७ वर्षीय वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. विशेष म्हणजे या मुलांनी आपल्या कृत्याचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर शेअर केला आहे. पोलिसांनी सर्व पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

रचकोंडा येथील पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबादमधील ९ आणि १० व्या वर्गात शिकणाऱ्या पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका वर्गमैत्रिणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच या सर्व कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत तो इतरांना व्हॉट्सअॅपवर शेअरही केला. पीडित अल्पवयी मुलीचे कुटुंबीय घरी नसल्याचे हेरत आरोपींनी ऑगस्ट महिन्यात हे कृत्य केले होते. या कृत्याच्या १० दिवसांनंतर पाच जणांपैकीच एकाने आपल्या दुसऱ्या एका मित्राला सोबतघेत या अल्पवयीन मुलीवर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचार केला.

या घटनेनंतर पीडित मुलीने तिच्याशी घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीदेखील घटनेचे गांभीर्य ओळखत भारतीय दंडविधान, पोक्सो, तसेच आयटी कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या सर्व आरोपी मुलांना ताब्यात घेतले आहे. तसेच सर्व आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 10:15 IST
Next Story
विश्लेषण: आणखी एका राज्यात `आपʼचा शिरकाव; हरयाणात थेट दुसऱ्या क्रमांकावर!