आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक घोषणा केलीय. नुकत्याच प्रदर्शित झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची सुट्टी दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय.

नक्की वाचा >> “मी ‘गुजरात फाइल्स’ बनवायला तयार, सत्य मांडणार पण तुम्ही आश्वासन द्या की…”; दिग्दर्शकाची मोदींकडे मागणी

मुख्यमंत्र्यांनी सोशल नेटवर्किंग वरुन यासंदर्भात घोषणा केलीय. कू या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरुन केलेल्या पोस्टमध्ये राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना “हे सांगताना आनंद होतोय की आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना द कश्मीर फाइल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची सूट देण्यात आलीय. त्यांना केवळ त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात कळवावं लागेल. तसेच दुसऱ्या दिवशी चित्रपटाची तिकीटं वरिष्ठांकडे जमा करावी लागतील”, असं मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

austrelian
भारतातील निवडणुकीचं वार्तांकन करण्याची परवानगी ऑस्ट्रेलिअन पत्रकाराला नाकारली? सरकारने स्पष्ट केली भूमिक
The Supreme Court asked the central government why it stopped the action against fraudulent advertisements
फसव्या जाहिरातींवरील कारवाई का रोखली? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
adhirranjan choudhari
दुसऱ्या टप्प्यात ध्रुवीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी; १३ राज्यांत लोकसभेच्या ८९ जागांसाठी शुक्रवारी मतदान

नक्की वाचा >> “केंद्र सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’वर बंदी घालावी, या चित्रपटामुळे…”; खासदाराने केली मागणी

हेमंत बिस्वा शर्मा आणि आसामच्या संपूर्ण मंत्रीमंडळाने सोमवारी हा चित्रपट थेअटरमध्ये जाऊन पाहिला. यासंदर्भातील पोस्टही त्यांनी केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी काश्मीरमधील पंडितांचं हत्याकांड हे मानवतेला मोठा धक्का होता असं हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलेलं.

नक्की वाचा >> The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…”

भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या वादावर मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी केली. ‘सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’, असा आरोप मोदींनी केला.

नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?

काश्मीर खोऱ्यमतून १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी मंगळवारी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले.

नक्की वाचा >> Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”

‘हा चित्रपट काश्मिरी पंडितांबाबत कित्येक वर्षे जाणीपूर्वक दडवून ठेवलेले सत्य मांडतो. मात्र, या चित्रपटाची बदनामी केली जात आहे. एखाद्याला हा चित्रपट आवडला नसेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा वा प्रतिवाद करणारा चित्रपट निर्माण करावा’, असे मत मोदी यांनी भाजपाच्या खासदारांसमोर मांडले.

कुठलाही सिनेमा चांगला की, वाईट याची नीट समीक्षा केली पाहिजे पण, त्याऐवजी या चित्रपटाविषयी शंका-कुशंका घेतल्या जात असून हे कट-कारस्थान आहे. कुठल्याही विषयावर योग्य मार्गाने सत्याची मांडणी झाली पाहिजे. त्यामुळे चिंता फक्त या चित्रपटाबद्दल नाही. देशाच्या भल्यासाठी सत्य मांडले पाहिजे. संबधित विषयातील एक बाजू एखाद्याला महत्त्वाची वाटू शकते, दुसऱ्याला अन्य एखादी बाजू महत्त्वाची वाटेल. हा चित्रपटातून सत्य मांडले जात असेल तर त्याला विरोध कशासाठी केला जात आहे, असा सवाल मोदींनी केला.

नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”

पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना आर्थिक व लष्करी मदत पुरवली गेली. दहशतवाद्यांनी अनेक काश्मिरी पंडितांची हत्या केली. या हत्यासत्रानंतर काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पलायन करावे लागले होते. विस्थापित झालेले काश्मिरी पंडित अजूनही खोऱ्यात परत येऊ शकलेले नाहीत. हे सत्य ज्यांना दडपून टाकायचे आहे, तेच या चित्रपटाला विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले.