पुणे : उच्चांकी दर मिळाळेल्या लसणाच्या दरात निम्म्याने घट झाली आहे. नवीन लसणाचा हंगाम सुरू झाला असून, मध्यप्रदेशातून लसणाची आवक वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी एक किलो लसणाचे दर ४०० रुपये किलोपर्यंत होते. नवीन लसणाची आवक सुरू झाल्यानंतर दरात घसरण झाली आहे.

किरकोळ बाजारात एक किलो लसणाला प्रतवारीनुसार २०० ते २५० रुपये दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर ४०० रुपये किलो होते. लसूण दरातील तेजीची झळ गृहिणींना सोसावी लागत होती. पाव किलो लसणाचे दर १०० रुपयांपर्यंत होते. नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारात दररोज २० ते ३० टन लसणाची आवक होत आहे.

Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

हेही वाचा >>>पिंपरी : स्वदेशी शस्त्रात्रनिर्मितीसाठी करार; सैन्य दलप्रमुख जनरल मनोज पांडे यांची माहिती

परराज्यातील लसणावर भिस्त

महाराष्ट्रात गावरान लसणाची लागवड कमी होत असल्याने परराज्यातील लसणाला मागणी वाढली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.

लसणाच्या दरात आणखी घट

लसणाचा नवीन हंगाम सुरू झाला असून, मध्यप्रदेशातील लसणाची आवक वाढली आहे. थंडी ओसरल्यानंतर परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू होतो. पुढील तीन ते चार महिने लसणाची मोठी आवक होणार आहे. दरात आणखी घट होणार आहे.- विलास भुजबळज्येष्ठ अडते, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

लसणाचे दर

● घाऊक बाजारात दहा किलोचे दर- १००० ते १६०० रुपये

● किरकोळ बाजारात एक किलोचे दर – २०० ते २५० रुपये