पीटीआय, नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी शुभेच्छा देताना म्हंटले आहे, की दिवाळीच्या महापर्वाने सर्व देशवासीयांच्या जीवनात सुख-समृद्धी वृद्धिंगत होवो, यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. प्रकाश आणि आनंद-उत्साहाच्या या पवित्र सणानिमित्त आपण ज्ञान, ऊर्जास्वरूपी दीप प्रज्ज्वलित करून गरजू-वंचितांचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘ट्वीट’द्वारे दिवाळी सण आनंद आणि समृद्धी घेऊन येवो अशा शुभेच्छा देशवासीयांना दिल्या. त्यांनी ‘ट्वीट’ केले, की तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिव्यांचा हा सण सर्वाच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. तुमची दिवाळी तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत आनंदात जावो.