देशभरात आज उत्सवात होळी साजरी केली जात आहे. ‘रंगात रंगुनी सारे..’ असे म्हणत सर्व भारतीय धुळवडीच्या रंगात रंगुनी जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही होळीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी ट्विट करत भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व भारतीयांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आनंद आणि प्रेम देणारा हा होळीचा सण आपल्यातील एकता आणि सद्भावनेच्या रंगाला आणखी वाढवेल, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

धुळवडीचा रंग काढण्यासाठी या सोप्या टिप्सचा करा वापर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. रंग विकासाचेरंग समृद्धीचे रंग तळागाळाचे परिवर्तनातून झालेल्या परिवर्तनाचे, धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ! असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

 (Holi 2019 : घरच्या घरी तयार करा थंडाई ! )

भारतात रंगाच्या उत्सवाला मोठं महत्त्व आहे. विशेष करून उत्तर भारतात रंग मोठ्या प्रमाणात खेळले जातात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, अजित पवार, राज ठाकरे आणि इतर दिग्गज नेत्यांनी देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुगलचे डुडल –

विविध रंगाच्या रंगात सारे न्हाऊन निघत असताना गुगल का बरं मागे हटेल? दरवर्षीप्रमाणे गुगलनं यावर्षीही धूलिवंदन निमित्त खास डुडल तयार केलं आहे.  धूलिवंदनाच्या विविध रंगात रंगून गेलेलं डुडल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.होळीनंतर येणारा धूलिवंदनाचा सण देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या रंगोत्सवाची छोटीशी झलक गुगलच्या डुडलमध्ये दिसत आहे.