scorecardresearch

Premium

जगभरातील राष्ट्रप्रमुखांकडून शुभेच्छा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी मंगळवारी भारताला ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Independence Day Celebration
(दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, भाजपचे नेते विनोद तावडे, बी. एल. संतोष आदी उपस्थित होते.)

पीटीआय, मॉस्को/ वॉशिंग्टन

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी मंगळवारी भारताला ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताबरोबरची त्यांची ‘खास’, ‘विशेषाधिकारप्राप्त’, आणि ‘धोरणात्मक’ भागीदारी अधोरेखित केली.

Jitendra Awhad on Rohan Bopanna and Sharad pawar
“खेळ असो वा राजकारण, पात्रता…”, बोपण्णाला शुभेच्छा देताना आव्हाडांनी अजित पवार गटाला डिवचले
narendra modi and emmanuel macron
प्रजासत्ताकदिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी भूषवले प्रमुख अतिथिपद; फ्रान्स-भारत यांच्यातील संबंध कसे आहेत? जाणून घ्या…
Strong performance of Indian economy President Draupadi Murmu message on the eve of Republic Day
भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी; प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश
Prime Minister Narendra Modi welcomes French President Emmanuel Macron at the historic Jantar Mantar in Jaipur
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांचे जयपूरमध्ये स्वागत; पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांची जंतरमंतरला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशात रशियन अध्यक्ष पुतिन म्हणाले की, ‘‘प्रादेशिक आणि जागतिक अजेंडय़ावरील महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रे रचनात्मक भागीदारीद्वारे सर्व क्षेत्रांमध्ये फलदायी द्विपक्षीय सहकार्याला चालना देत राहतील, असा विश्वास आहे. आम्ही भारताबरोबरच्या विशेष धोरणात्मक भागीदारीच्या संबंधांना खूप महत्त्व देतो.’’

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Happy independence day from heads of state around the world amy

First published on: 16-08-2023 at 02:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×