दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना व निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारकडून आज आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण, प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कॅबिनेटच्या आज होणाऱ्या बैठकीत महागाई भत्ता(डीआर) ३ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर या निर्णयाबाबतची घोषणा केली जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली तर, तो सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या ३१ टक्के डीए रुपात मिळेल. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

या वर्षी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या स्थगित करण्यात आलेल्या डीए आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीआर मध्ये वाढ केली होती आणि या वर्षी १ जुलैपासून पुन्हा महागाई भत्ता लागू करण्याची घोषणा केली होती.

केंद्रीय कर्मचारी आणि निवृतीधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये ११ टक्के इतकी भरघोस वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै महिन्यात घेतला होता. त्यानुसार महागाईभत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला असून, ही वाढ १ जुलै २०२१ पासून लागू होईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ

या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. करोना संकटामुळे गेल्या वर्षी केंद्र सरकारने महागाई भत्त्याला स्थगिती दिली होती. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy news for central employees dearness allowance to rise by 3 percent msr
First published on: 21-10-2021 at 14:44 IST