दंगल माजविणे आणि माध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला करण्याच्या आरोपावरून पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला मेहसाणा जिल्ह्य़ातील विसनगर शहरातील स्थानिक न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मेहसाणा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री हार्दिकला न्यायदंडाधिकारी ए. एन. पटेल यांच्या निवासस्थानी हजर केले आणि पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी हार्दिकला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

विसनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हार्दिक पटेल याच्याविरुद्ध २३ जुलै रोजी दंगल माजविल्याचा आणि हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. विसनगर पोलिसांनी ११ जानेवारी रोजी हार्दिक पटेल याला सुरतमधील कारागृहातून ताब्यात घेतले.