इच्छा मृत्यूची संमती मिळालेल्या हरीश राणाचा एम्स रुग्णालयात मृत्यू झाला आहे. एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. हरीश राणाला इच्छा मृत्यूची संमती मिळाली म्हणून त्याच्या आई वडिलांनी तीन वर्षे संघर्ष केला होता. मागची १३ वर्षे तो मृत्यूशय्येवर होता पण त्याचा मृत्यू झाला नव्हता. त्याने आयुष्यातील १३ वर्षे कोमात गेली. पीटीआयन त्याच्या निधनाचं वृत्त दिलं आहे.

हरीश राणा १३ वर्षांपासून कोमात होता

हरीश राणा १३ वर्षांपासून कोमामध्ये होता. हरीश राणाला १४ मार्चमध्ये त्याच्या घरातून एम्स रुग्णालयात आणलं होतं. त्याला पॅसिव्ह युथिनिशिया म्हणजेच इच्छामृत्यूची संमती देण्यात आली. १० सदस्यीय डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आलं होतं. आज २४ मार्च रोजी म्हणजेच १० दिवसांनी हरीश राणाचा मृत्यू झाला.

हरीश राणाची आई एम्स रुग्णालयात हनुमान चालीसा म्हणत होती

हरीश राणाचा आज एम्स रुग्णालयात मृत्यू झाला. त्याआधी मागील सहा ते सात दिवसांपासून त्याला अन्न देण्यात आलं नव्हतं. मागील सहा दिवस त्याला वेदनारहीत मृत्यू मिळावा यासाठीच्या प्रक्रिया सुरु होत्या. आज त्याची आई रुग्णालयाच्या आवारात हनुमान चालीसा म्हणत होती. हरीश राणा १३ वर्षांपासून कोमात होता. पण माझ्या मुलाचा श्वास सुरु आहे, पण तो मला सोडून जाईल कुठल्याही क्षणी असंही त्यांनी म्हटलं होतं. आज अखेर हरीशचा मृत्यू झाला.

काय काय घडलं ११ मार्चपासून?

हरीश राणाला ११ मार्च सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मरणाची संमती ११ मार्चला दिली.

हरीशला गाझियाबाद या ठिकाणी असलेल्या त्याच्या घरातून १४ मार्चला एम्स रुग्णालयात आणलं गेलं.

हरीशला त्याच्या घरातून जेव्हा निरोप दिला गेला तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं होतं.

हरीशचे वडील अशोक राणा १४ मार्चला म्हणाले होते की आम्हाला माफ करा, आमची इच्छा नाही तरीही आम्हाला हे पाऊल उचलावं लागतं आहे.

हरीशला १४ मार्चला रुग्णालयात आणलं गेलं तेव्हाही सगळ्यांचे डोळे पाणावले होते

१८ मार्चला हरीश राणाची लाइफ सपोर्ट सिस्टिम काढण्यात आली, फिडिंग पाईप, पाणी देण्याचा पाईप काढण्यात आला.

हरीशला मागच्या सहा दिवसांपासून मेंदूच्या औषधांशिवाय कुठलीही औषधं देण्यात आली नाहीत.

हरीशला देण्यात येणारं अन्न-पाणीही बंद करण्यात आलं.

हरीशचा मृत्यू कधी होणार? यावर डॉक्टर लक्ष ठेवून होते, आज त्याचा मृत्यू झाला

हरीश राणा १३ वर्षांपासून कोमात होता. हरीश राणाने स्कूटर घेतली होती आणि तो जात असताना त्याचा अपघात झाला. या अपघातातून हरीश राणा वाचला, पण तो अशा अवस्थेत गेला. हरीशला क्वाड्रिप्लेजिया हा दुर्धर आजार झाला, त्याच्या संपूर्ण शरीराला १०० टक्के अपंगत्व आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा अवस्थेतील रुग्णांच्या उपचारांचा आर्थिक बोजा अत्यंत मोठा असतो. “आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येक जण शर्थीचे प्रयत्न करतो. मात्र, अशा व्यक्तीवरील उपचारांचा खर्च प्रचंड आहे आणि रुग्णाचे बरे होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अनेक कुटुंबे स्वत:हून उपचार थांबविण्याचा निर्णय घेतात,” असे हैदराबादमधील केअर रुग्णालयातील अपघातग्रस्त विभागाचे प्रमुख डॉ. भवानी प्रसाद गुडवल्ली यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं होतं. हरीश राणाची स्थिती बरी होण्यासारखी नाही त्यामुळे त्याला इच्छामरण मिळावं अशी मागणी करण्यात आली होती. जी ११ मार्चला सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली, आज अखेर हरीश राणाचा मृत्यू झाला.