scorecardresearch

नशामुक्तीच्या मुद्द्यावरून बोलताना हरसिमरत कौरांची भगवंत मान यांच्यांवर खोचक टीका; अमित शहांनाही हसू आवरेना, पाहा VIDEO

संसदेत नशामुक्तीच्या मुद्द्यावरून बोलताना हरसिमरत कौर यांनी पंजाबमधील आप सरकार जोरदार निशाणा साधला.

नशामुक्तीच्या मुद्द्यावरून बोलताना हरसिमरत कौरांची भगवंत मान यांच्यांवर खोचक टीका; अमित शहांनाही हसू आवरेना, पाहा VIDEO
फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

जी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत संसदेत यायची, तीच आता आमचे राज्य चालवते आहे, अशी टीका शिरोमणी अकालीदलच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर केली आहे. मंगळवारी संसदेत नशामुक्तीच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी पंजाबमधील आप सरकार जोरदार निशाणा साधला.

हेही वाचा – “न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अधिकार सरकारला देणं…”, कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता; किरेन रिजिजूंना देखील फटकारलं

मंगळवारी संसदेत अंमली पदार्थ आणि नशा मुक्तीच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली. यावेळी बोलताना शिरोमणी अकालीदलच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यांवर खोचक शब्दात टीका केली. “काही महिन्यांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री खासदार म्हणून याच सभागृहात बसायचे. ते सकाळी ११ वाजता सभागृत येत होते. ते काय खात-पीत होते, माहिती नाही. मात्र, ते जेव्हा यायचे तेव्हा सभागृहातील इतर सदस्य आपली जागा बदलण्याची मागणी करत होते”, असे त्या म्हणाल्या. कौर यांच्या या टीकेनंतर अमित शहांसह इतर सदस्यांमध्येही हशा पिकला.

हेही वाचा – संसदेत भरड धान्यांची खास मेजवानी!

दरम्यान, पुढे बोलताना, “एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री अशा प्रकारे वागत असेल, तर त्या राज्याची अवस्था काय होईल? याची कल्पना न केलेलीच बरी, अशी टीकाही कौर यांनी केली. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ‘मद्यप्राशन करून गाडी चालवू नका’, अशा प्रकारचे फलक लावले आहेत. मात्र, आमचे मुख्यमंत्री मद्यपान करून राज्य चालवत आहेत”, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 11:31 IST

संबंधित बातम्या