Harvard University : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या निर्णयांमध्ये नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) आणि अमेरिकेतील कर्मचारी कपात, बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा यासह आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास हार्वर्ड विद्यापीठावर बंदी करण्यात आल्याच्या निर्णयाचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या निर्णयांचा फटका अनेक देशांना बसला आहे.त्यानंतर आता हार्वर्डमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतासह विदेशातील विद्यार्थ्यांना देखील ट्रम्प यांच्या निर्णयांचा फटका बसला आहे.

या निर्णयांची संपूर्ण जगात चर्चा सुरु असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. हार्वर्ड विद्यापीठाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट आव्हान दिलं आहे. हार्वर्ड विद्यापीठ प्रशासनाने ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात खटला दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता आणि कॅम्पसमधील कथित गैरवर्तनाचे कारण देत हार्वर्ड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी असलेले प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

एवढंच नाही तर हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांसाठी ६ अटींच्या पूर्ततेसाठी ७२ तासांची मुदत देण्यात आलेली आहे. तसेच जर या अटींची पूर्तता केली नाही तर अनेक विद्यार्थ्यांना अमेरिका देखील सोडावी लागू शकते.दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हार्वर्ड विद्यापीठाने शुक्रवारी ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल करत हा चुकीचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानंतर अवघ्या काही तासातंच हार्वर्ड विद्यापीठाने थेट न्यायालयात धाव घेत ट्रम्प प्रशासनाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला धक्का बसला आहे.

तसेच ट्रम्प यांच्या या निर्णयाला अमेरिकन संविधान आणि इतर कायद्यांचं उल्लंघन असल्याचं विद्यापीठाने म्हटलं आहे. या संदर्भात हार्वर्ड विद्यापीठाने बोस्टन फेडरल कोर्टात तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. हार्वर्ड विद्यापीठाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, विदेशी विद्यार्थ्यांची प्रवेश बंदी केल्याने विद्यापीठावर आणि ७००० हून अधिक व्हिसा धारकांवर गंभीर परिणाम होतील. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हार्वर्डच्या विद्यार्थ्यांचा एक चतुर्थांश भाग संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच हार्वर्डने ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला असून निर्णयाला बेकायदेशीर म्हटलं आहे. आम्ही या बेकायदेशीर कृतीचा निषेध करतो. हे हार्वर्डमधील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारे असल्याचं म्हटलं हार्वर्डने विद्यापीठाने म्हटलं आहे. तसेच हार्वर्डने विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व काही करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती सांगितली जात आहे.